S M L

'मुंबई महापालिकेत 702 कोटींचा गैरव्यवहार'

21 डिसेंबरमहाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या कारभाराचा गाडा हाकलणार्‍या मुंबई महानगरपालिकेत 702 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगनं ठेवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवरील कॅगचा अहवाल आज विधिमंडळामधे मांडण्यात आला. मुंबईतील रस्त्यांच्या 702 कोटींच्या कामांमध्ये गैरव्यवहार झालाय. तरतुदींचं उल्लंघन करुन निविदा न मागवता तफावत दाखवून अतिरिक्त कामं जोडून देण्याचा गैरव्यवहार झाला आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामांमध्येही गैरव्यवहार झाला असून खड्डे बुजवण्याची यंत्रं दोन वर्षांपासून वापरात आलेली नाहीत. रस्त्यांची क्षमता सुधारण्यासाठी हाती घेतलेल्या सॉफ्टवेअर विकासाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगनं ठेवला आहे. मालमत्ता विभागात 45 कोटींचा महसुली तोटा झाल्याचं उघड झालं आहे. टेट्रा पॅक सुवासिक दुधाच्या खरेदीत 2 कोटी 74 लाखांचा निष्फळ खर्च झालाय. संगणकीकरणाच्या कामात सॉफ्टवेअर कंपन्यांना गैरवाजवी लाभ झाला आहे असं कॅगच्या अहवालात स्पष्ट झालं आहे. जेएनयुआरएम (JNURM) च्या कामात मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये 250 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपकाही कॅगनं ठेवला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2012 10:48 AM IST

'मुंबई महापालिकेत 702 कोटींचा गैरव्यवहार'

21 डिसेंबर

महाराष्ट्राची राजधानी मुंबईच्या कारभाराचा गाडा हाकलणार्‍या मुंबई महानगरपालिकेत 702 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगनं ठेवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवरील कॅगचा अहवाल आज विधिमंडळामधे मांडण्यात आला. मुंबईतील रस्त्यांच्या 702 कोटींच्या कामांमध्ये गैरव्यवहार झालाय. तरतुदींचं उल्लंघन करुन निविदा न मागवता तफावत दाखवून अतिरिक्त कामं जोडून देण्याचा गैरव्यवहार झाला आहे. रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामांमध्येही गैरव्यवहार झाला असून खड्डे बुजवण्याची यंत्रं दोन वर्षांपासून वापरात आलेली नाहीत.

रस्त्यांची क्षमता सुधारण्यासाठी हाती घेतलेल्या सॉफ्टवेअर विकासाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगनं ठेवला आहे. मालमत्ता विभागात 45 कोटींचा महसुली तोटा झाल्याचं उघड झालं आहे. टेट्रा पॅक सुवासिक दुधाच्या खरेदीत 2 कोटी 74 लाखांचा निष्फळ खर्च झालाय. संगणकीकरणाच्या कामात सॉफ्टवेअर कंपन्यांना गैरवाजवी लाभ झाला आहे असं कॅगच्या अहवालात स्पष्ट झालं आहे. जेएनयुआरएम (JNURM) च्या कामात मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये 250 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपकाही कॅगनं ठेवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2012 10:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close