S M L

'त्या'पोलीस कॉन्स्टेबलचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

26 डिसेंबरदिल्ली येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवनाबाहेर केलेल्या आंदोलनात पोलीस कॉन्स्टेबल सुभाष तोमर यांच्या मृत्यूनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सुभाष तोमर यांचा आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत मृत्यू झाल्या होता असा दावा दिल्ली पोलिसांनी केला होता. पण तोमर यांच्या शरीरावर कुठल्याही जखमा नव्हत्या असा दावा राम मनोहर लोहिया हॉस्पिटलनं केलाय. हॉस्पिटलमध्ये जेव्हा तोमर यांना आणले होते तेव्हा त्यांच्या शरिरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. आंदोलनाच्या ठिकाणी ड्यूटीवर असतांना त्यांना हार्ट ऍटॅकमुळे तोमर बेशुद्ध पडले होते अशी माहिती डॉक्टरनी दिलीये. तोमर यांच्यावर अगोदरपासूनच ह्रदयविकाराचे उपचार सुरू होते. महत्वाचं म्हणजे आंदोलन करणार्‍या तरुणांनीचं तोमर यांनी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी मदत केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आणि जामीनही दिला. या आठ जणांमध्ये आम आदमी पक्षाचा कार्यकर्त्याचा सहभाग आहे. या आठही जणांना आम आदमी पक्षाचे मनिष शिसोदिया यांनी जामीन दिला होता. तर पोलिसांनी तोमर यांचा मृत्यू आंदोलनात दगडफेकीत झाला असल्याचा दावा केला होता मात्र आता मेडिकल रिपोर्टमुळे पोलिसांचा दावा साफ खोटा ठरला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2012 09:19 AM IST

'त्या'पोलीस कॉन्स्टेबलचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

26 डिसेंबर

दिल्ली येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवनाबाहेर केलेल्या आंदोलनात पोलीस कॉन्स्टेबल सुभाष तोमर यांच्या मृत्यूनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सुभाष तोमर यांचा आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत मृत्यू झाल्या होता असा दावा दिल्ली पोलिसांनी केला होता. पण तोमर यांच्या शरीरावर कुठल्याही जखमा नव्हत्या असा दावा राम मनोहर लोहिया हॉस्पिटलनं केलाय. हॉस्पिटलमध्ये जेव्हा तोमर यांना आणले होते तेव्हा त्यांच्या शरिरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. आंदोलनाच्या ठिकाणी ड्यूटीवर असतांना त्यांना हार्ट ऍटॅकमुळे तोमर बेशुद्ध पडले होते अशी माहिती डॉक्टरनी दिलीये. तोमर यांच्यावर अगोदरपासूनच ह्रदयविकाराचे उपचार सुरू होते. महत्वाचं म्हणजे आंदोलन करणार्‍या तरुणांनीचं तोमर यांनी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यासाठी मदत केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना अटक केली आणि जामीनही दिला. या आठ जणांमध्ये आम आदमी पक्षाचा कार्यकर्त्याचा सहभाग आहे. या आठही जणांना आम आदमी पक्षाचे मनिष शिसोदिया यांनी जामीन दिला होता. तर पोलिसांनी तोमर यांचा मृत्यू आंदोलनात दगडफेकीत झाला असल्याचा दावा केला होता मात्र आता मेडिकल रिपोर्टमुळे पोलिसांचा दावा साफ खोटा ठरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2012 09:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close