S M L

मृत्यूशी झगडणारा संजय कथार

4 डिसेंबर, मुंबईअलका धुपकर मुंबईतल्या हल्ल्यात जखमी झालेल्यांनी धैर्यानं या सगळ्या परिस्थितीला तोंड दिलं. नाशिकच्या राहुरीमधल्या कथार कुटुंबावरही हे संकट आलं. कुलाब्यामध्ये राहणारा त्यांचा मुलगा संजय कथार हा ग्रेनेड हल्ल्यात जखमी झालाय.22 वर्षांचा संजय पवईच्या झेंटा फायनाशियल कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. पहिल्याच दिवशी लिओपोल्ड कॅफेबाहेर तो दहशतवाद्यांच्या तावडीत सापडला. "मी चक्कर येउन खाली पडलो. हातातून रक्त येतं होतं. पोटाला लागलेलं मला कळलंच नव्हतं. मग मला कोणीतरी टॅक्सीत बसवून दिलं. मी एकटाच जीटी हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांना सांगितलं की माझ्या पोटात दुखतंय. मग त्यांनी बघितलं आणि सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल" असं संजय कथारनं सांगितलं. मुलाला जीवापाड जपणारे संजयचे वडीलच सध्या त्याची सगळी सेवा करतायत. आपला मुलगा लवकरात लवकर बरा व्हावा, हीच त्यांची इच्छा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2008 01:17 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2008 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close