S M L

'तिचं' नाव उघड होऊ द्या -शशी थरूर

01 जानेवारीदिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार झालेल्या तरूणीच्या नावावरून आता नवा वाद निर्माण झालाय. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांनी सुचवलंय की, नव्या बलात्कारविरोधी कायद्याला या पीडित तरूणीचं नाव देण्यात यावं त्यांनी यासंदर्भात टिवट्‌रवर वादग्रस्त प्रतिक्रिया नोंदवली आहे. शशी थरूर एवढ्यावरच थांबले नाही ते म्हणतात, दिल्लीत सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीची ओळख आता का लपवली जातेय, हे मला कळत नाही. तिचं खरं नाव घेऊन आपण तिचा सन्मानच करू. तिच्या पालकांची हरकत नसेल तर सुधारित बलात्कारविरोधी कायद्याला तिचं नाव दिलं जावं. ती एक व्यक्ती होती, फक्त प्रतीक नाही असं वादग्रस्त टिवट् थरूर यांनी केलंय. या अगोदरही राष्ट्रपतीपुत्र आणि काँग्रेसचे खासदार अभिजीत मुखर्जी यांनी आंदोलकांवर टीका केली होती. दिल्लीत जमलेल्या तरूणाईला वस्तुस्थितीशी काही एक घेणं देणं नाही. ही लोकं मेणबत्या मिरवतात आणि रात्री डिस्कोला जातात असं वादग्रस्त विधान करून जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. याबद्दल त्यांना माफीही मागावी लागली. पण आता शशी थरूर यांनी बलात्कार पीडित तरूणीचे नाव जाहीर करावे अशी सुचनाच करून नव्या वादाला तोंड फोडलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2013 05:07 PM IST

'तिचं' नाव उघड होऊ द्या -शशी थरूर

01 जानेवारी

दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार झालेल्या तरूणीच्या नावावरून आता नवा वाद निर्माण झालाय. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री शशी थरूर यांनी सुचवलंय की, नव्या बलात्कारविरोधी कायद्याला या पीडित तरूणीचं नाव देण्यात यावं त्यांनी यासंदर्भात टिवट्‌रवर वादग्रस्त प्रतिक्रिया नोंदवली आहे. शशी थरूर एवढ्यावरच थांबले नाही ते म्हणतात, दिल्लीत सामूहिक बलात्कार झालेल्या मुलीची ओळख आता का लपवली जातेय, हे मला कळत नाही. तिचं खरं नाव घेऊन आपण तिचा सन्मानच करू. तिच्या पालकांची हरकत नसेल तर सुधारित बलात्कारविरोधी कायद्याला तिचं नाव दिलं जावं. ती एक व्यक्ती होती, फक्त प्रतीक नाही असं वादग्रस्त टिवट् थरूर यांनी केलंय. या अगोदरही राष्ट्रपतीपुत्र आणि काँग्रेसचे खासदार अभिजीत मुखर्जी यांनी आंदोलकांवर टीका केली होती. दिल्लीत जमलेल्या तरूणाईला वस्तुस्थितीशी काही एक घेणं देणं नाही. ही लोकं मेणबत्या मिरवतात आणि रात्री डिस्कोला जातात असं वादग्रस्त विधान करून जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. याबद्दल त्यांना माफीही मागावी लागली. पण आता शशी थरूर यांनी बलात्कार पीडित तरूणीचे नाव जाहीर करावे अशी सुचनाच करून नव्या वादाला तोंड फोडलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2013 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close