S M L

मध्य रेल्वे मेगाब्लॉकचे 4 बळी

31 डिसेंबरमध्य रेल्वेच्या सोळा तासांच्या मेगाब्लॉकचा परिणाम मुंबईकरांच्या जीवावर बेतला. मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची गर्दी वाढली. त्यात 4 जणांना प्राण गमवावे लागले. रविवारी सकाळपासून मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू झाला आणि सोमवारी संध्याकाळी उशीरापर्यंत याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. सीएसटी- ते कर्जत कसारा अशा मध्य रेल्वेच्या सर्वच स्टेशनवर रेल्वेप्रवाशांची गर्दी उसळली. ही गर्दीच चार जणांच्या जीवावर बेतली. सकाळी दिवा स्टेशनजवळ लोकलमधून पडून एका 65 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दुपारी घाटकोपर ते कुर्लादरम्यान लोकलमधून पडून आणखी दोघांचा मृत्यू झाला. काल मुलुंडजवळ लोकलमधून पडून दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्यातील एकाचा मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय.आज दुपारी विक्रोळी इथं अशोक शेलार याचा तर घाटकोपर इथं दिपेश कदम यांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. रविवारी नेहमी प्रमाणे मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक होता. पण हा मेगाब्लॉक सोमवारीही सुरुच राहिला त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. आजही दिवसभर त्रास कायम आहे. आज सकाळपासून लोकलचं वेळापत्रक कोलमडल्यानं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे हाल झालेत. मध्य रल्वेची वाहतूक अर्धा तास ते 40 मिनिटं उशिरानं सुरू आहे. काल रात्री दोन वाजेपर्यंत काम पूर्ण होईल असं मध्य रेल्वेनं सांगितलं होतं. ते आज सकाळी सहा वाजता पूर्ण झालं असं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मालेगावकर यांनी सांगितलं. पण या कामाचा परिणाम आज संध्याकाळपर्यंत कायम राहील असंही ते म्हणाले. त्यामुळे संध्याकाळपर्यंत लोकल 30 ते 40 मिनिटं उशीरानं धावणार आहेत. काही गाड्या रद्दही कराव्या लागण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. सीएसटी ते कर्जत कसारा अशा सर्वच स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी उसळली होती. आता संध्याकाळनंतरही मध्य रेल्वे काहीशा विलंबानं धावत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2012 09:36 AM IST

मध्य रेल्वे मेगाब्लॉकचे 4 बळी

31 डिसेंबरमध्य रेल्वेच्या सोळा तासांच्या मेगाब्लॉकचा परिणाम मुंबईकरांच्या जीवावर बेतला. मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची गर्दी वाढली. त्यात 4 जणांना प्राण गमवावे लागले. रविवारी सकाळपासून मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू झाला आणि सोमवारी संध्याकाळी उशीरापर्यंत याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागला. सीएसटी- ते कर्जत कसारा अशा मध्य रेल्वेच्या सर्वच स्टेशनवर रेल्वेप्रवाशांची गर्दी उसळली. ही गर्दीच चार जणांच्या जीवावर बेतली. सकाळी दिवा स्टेशनजवळ लोकलमधून पडून एका 65 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दुपारी घाटकोपर ते कुर्लादरम्यान लोकलमधून पडून आणखी दोघांचा मृत्यू झाला. काल मुलुंडजवळ लोकलमधून पडून दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्यातील एकाचा मृत्यू झालाय, तर एक जण गंभीर जखमी झालाय.आज दुपारी विक्रोळी इथं अशोक शेलार याचा तर घाटकोपर इथं दिपेश कदम यांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला.

रविवारी नेहमी प्रमाणे मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक होता. पण हा मेगाब्लॉक सोमवारीही सुरुच राहिला त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. आजही दिवसभर त्रास कायम आहे. आज सकाळपासून लोकलचं वेळापत्रक कोलमडल्यानं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांचे हाल झालेत. मध्य रल्वेची वाहतूक अर्धा तास ते 40 मिनिटं उशिरानं सुरू आहे. काल रात्री दोन वाजेपर्यंत काम पूर्ण होईल असं मध्य रेल्वेनं सांगितलं होतं. ते आज सकाळी सहा वाजता पूर्ण झालं असं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मालेगावकर यांनी सांगितलं. पण या कामाचा परिणाम आज संध्याकाळपर्यंत कायम राहील असंही ते म्हणाले. त्यामुळे संध्याकाळपर्यंत लोकल 30 ते 40 मिनिटं उशीरानं धावणार आहेत. काही गाड्या रद्दही कराव्या लागण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. सीएसटी ते कर्जत कसारा अशा सर्वच स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी उसळली होती. आता संध्याकाळनंतरही मध्य रेल्वे काहीशा विलंबानं धावत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2012 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close