S M L

डॉ. मंगेशीकरांचा थरारक अनुभव

4 डिसेंबर, मुंबईअलका धुपकरदहशतवाद्यांपासून लपून राहून हॉटेल ताज मधून सुखरुप बाहेर पडलेल्या गावदेवी इथल्या डॉक्टर प्रशांत मंगेशीकर यांनी त्यांचा सगळा थरारक अनुभव आयबीएन लोकमतसोबत शेअर केला. समोर मृत्यू दिसत होता. आपल्या मृत्यूची त्यांनी मानसिक तयारीही केली होती. पण आश्चर्यकारकपणे ते यातून सुटले.डॉ. प्रशांत मंगेशीकर हॉटेल ताजमध्ये एका लग्नाच्या कॉकटेल पार्टीसाठी बायको आणि मुलीसोबत गेले होते. तितक्यात फटाक्याचे आवाज ऐकायला लागले. त्यांना वाटलं लग्नासाठीचे फटाके आहेत, पण आवाजाची इन्टेन्सिटी वाढायला लागली तसं कळलं की हे गनशॉट आहेत. सुरक्षेसाठी ते ताजच्या चेंबर रूममध्ये पळाले. "साउथ मुंबईतल्या एका शाळेची टीचर पण गनशॉटमध्ये ठार झाली. पळताना माझ्या पुढचा माझ्या मागे पडला. त्याच्यावर अतिरेक्यांनी गोळ्या झाडल्या" असं डॉ. प्रशांत मंगेशीकरांनी सांगितलं. एवढ्या गोंधळातही त्या जखमी माणसावर डॉक्टर पती-पत्नीनी उपचार केले. "त्याचं आतडं आम्ही आत घातलं.ग्लोव्हज नव्ते, सीझर नव्हती. फस्ट एडच हॉटेलचं सामान होतं तेच वापरलं. त्याला बँडेज म्हणून बेडशीट बांधली" असं डॉ. मंगेशीकर म्हणालेया काळात त्यांना सुटकेची शक्यता मात्र वाटत नव्हती. "मला कळलं की आम्ही आता थोड्याच वेळात मरणार... मग मी माझ्या टॅक्स कन्स्लटंटला फोन केला आणि माझ्या वीलबद्दल सांगितलं. त्यानंतर मी, माझी बायको आणि मुलीने एकत्र फोटो काढले. समजा आमचा मोबाईल सापडला तर मुलाला आमचा शेवटचा फोटो मिळेल म्हणून" असं ते म्हणाले. पण मरणाच्या दारातून एनएसजीच्या कमांडोनी डॉक्टरांच्या कुटुंबाची अखेर सुटका केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2008 01:33 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2008 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close