S M L

आज टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा मुकाबला

28 डिसेंबरपाकिस्तानविरुद्धची पहिली टी 20 मॅच गमावल्यानंतर टीम इंडियासाठी आज करो या मरो अशी परिस्थिती असणार आहे. आज अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान दरम्यान दुसरी आणि शेवटची टी 20 मॅच रंगतेय. त्यामुळे ही मॅच जिंकत सीरिजमध्ये बरोबरी करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. तर दोनही टी 20 जिंकत भारतात पहिल्यांदाच टी 20 सीरिज जिंकण्याचा प्रयत्न पाकिस्तान करेल. पहिल्या टी 20 मॅचमध्ये भारताची दमदार बॅटिंग सपशेल फ्लॉप ठरली होती तर भारताच्या बॉलर्सनंही चांगली कामगिरी केली नव्हती. तर याउलट पाकिस्तानच्या बॉलर्सनं कमालीची कामगिरी केली होती. टीम इंडियाला झटपट गुंडाळण्यात पाकिस्तानी बॉलर्सना यश आलं होतं. तर झटपट विकेट गेल्यानंतरही मोहम्मद हाफीझ आणि शोएब मलिक यांच्या दमदार बॅटिंगनं पाकिस्ताननं टार्गेट पार केलं. त्यामुळे आज भारतीय टीम कसं प्रदर्शन करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2012 09:51 AM IST

आज टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा मुकाबला

28 डिसेंबर

पाकिस्तानविरुद्धची पहिली टी 20 मॅच गमावल्यानंतर टीम इंडियासाठी आज करो या मरो अशी परिस्थिती असणार आहे. आज अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान दरम्यान दुसरी आणि शेवटची टी 20 मॅच रंगतेय. त्यामुळे ही मॅच जिंकत सीरिजमध्ये बरोबरी करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. तर दोनही टी 20 जिंकत भारतात पहिल्यांदाच टी 20 सीरिज जिंकण्याचा प्रयत्न पाकिस्तान करेल. पहिल्या टी 20 मॅचमध्ये भारताची दमदार बॅटिंग सपशेल फ्लॉप ठरली होती तर भारताच्या बॉलर्सनंही चांगली कामगिरी केली नव्हती. तर याउलट पाकिस्तानच्या बॉलर्सनं कमालीची कामगिरी केली होती. टीम इंडियाला झटपट गुंडाळण्यात पाकिस्तानी बॉलर्सना यश आलं होतं. तर झटपट विकेट गेल्यानंतरही मोहम्मद हाफीझ आणि शोएब मलिक यांच्या दमदार बॅटिंगनं पाकिस्ताननं टार्गेट पार केलं. त्यामुळे आज भारतीय टीम कसं प्रदर्शन करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2012 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close