S M L

सावित्रीच्या लेकींचा छेडछाडीविरोधात 'दोन हात' करण्याचा निर्धार

03 जानेवारीसावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज कोल्हापूरमध्ये विद्यार्थी संघटनांच्या वतीनं दिल्ली सामूहिक बलात्कार घटनेचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विद्यार्थीनींचा सहभाग लक्षणीय होता. 'वो सरकार निकम्मी है' आणि 'बघता काय सामील व्हा' अशा घोषणा देत तरुणींनी दिल्लीतल्या घटनेचा निषेध करत संरक्षणाची मागणी केली. तसंच शहरातही यापुढं छेडछाड करणार्‍यांना जशास तसे उत्तर दिलं जाईल असा निर्धारही या तरुणींनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या आंदोलक विद्यार्थीनींनी ठाण मांडून सर्वसामान्यांचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला. या मोर्चामध्ये शिवाजी विद्यापीठासह शहरातल्या महाविद्यालयांमधले विद्यार्थी सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2013 02:05 PM IST

सावित्रीच्या लेकींचा छेडछाडीविरोधात 'दोन हात' करण्याचा निर्धार

03 जानेवारी

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज कोल्हापूरमध्ये विद्यार्थी संघटनांच्या वतीनं दिल्ली सामूहिक बलात्कार घटनेचा निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये विद्यार्थीनींचा सहभाग लक्षणीय होता. 'वो सरकार निकम्मी है' आणि 'बघता काय सामील व्हा' अशा घोषणा देत तरुणींनी दिल्लीतल्या घटनेचा निषेध करत संरक्षणाची मागणी केली. तसंच शहरातही यापुढं छेडछाड करणार्‍यांना जशास तसे उत्तर दिलं जाईल असा निर्धारही या तरुणींनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या आंदोलक विद्यार्थीनींनी ठाण मांडून सर्वसामान्यांचे लक्ष वेधण्याचाही प्रयत्न केला. या मोर्चामध्ये शिवाजी विद्यापीठासह शहरातल्या महाविद्यालयांमधले विद्यार्थी सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2013 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close