S M L

प्रजासत्ताक दिनी दिसणार नाही महाराष्ट्राचा चित्ररथ

26 डिसेंबरदरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी दिल्लीत राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिसणारा महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा मात्र दिसणार नाहीये. मंत्री, सचिव आणि अधिकार्‍यांमधील विसंवादामुळे यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाची प्रवेशिका पाठवायला उशीर झालाय. त्यामुळे महाराष्ट्राला यावर्षी या संचलनात सहभागी होता येणार नाही. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक समितीनं राज्य सरकारला यासंदर्भात कळवलंय. यावर्षी चित्ररथ कोणत्या विषयावर करायचा यावरून फक्त चर्चा रंगली आणि मंत्री आणि अधिकार्‍यांच्या विसंवादाचा फटका राज्याला बसलाय. दरम्यान, राज्यानं पाठवलेल्या विषयावर एनएफडीसीनंही प्रस्ताव पाठवला होता आणि त्यांचा प्रस्ताव मंजूर झालाय. आणि म्हणून महाराष्ट्राचा प्रस्ताव फेटाळला गेल्याची कबुली सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी दिली. तर राजपथावरील संचलनात चित्ररथ सहभागी झाला नाही तरी शिवाजी पार्कवर होणार्‍या संचलनात हा चित्ररथ सहभागी होईल असं संास्कृतिक कार्यसंचालक आशुतोष घोरपडे यांनी सांगितलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2012 10:42 AM IST

प्रजासत्ताक दिनी दिसणार नाही महाराष्ट्राचा चित्ररथ

26 डिसेंबर

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी दिल्लीत राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात दिसणारा महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा मात्र दिसणार नाहीये. मंत्री, सचिव आणि अधिकार्‍यांमधील विसंवादामुळे यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाची प्रवेशिका पाठवायला उशीर झालाय. त्यामुळे महाराष्ट्राला यावर्षी या संचलनात सहभागी होता येणार नाही. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक समितीनं राज्य सरकारला यासंदर्भात कळवलंय. यावर्षी चित्ररथ कोणत्या विषयावर करायचा यावरून फक्त चर्चा रंगली आणि मंत्री आणि अधिकार्‍यांच्या विसंवादाचा फटका राज्याला बसलाय. दरम्यान, राज्यानं पाठवलेल्या विषयावर एनएफडीसीनंही प्रस्ताव पाठवला होता आणि त्यांचा प्रस्ताव मंजूर झालाय. आणि म्हणून महाराष्ट्राचा प्रस्ताव फेटाळला गेल्याची कबुली सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांनी दिली. तर राजपथावरील संचलनात चित्ररथ सहभागी झाला नाही तरी शिवाजी पार्कवर होणार्‍या संचलनात हा चित्ररथ सहभागी होईल असं संास्कृतिक कार्यसंचालक आशुतोष घोरपडे यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2012 10:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close