S M L

लाज गेली, मालिकाही गेली

03 जानेवारीभारतीय क्रिकेट टीमची नव्या वर्षाची सुरुवातही पराभवानं झाली. कोलकाता इथं ईडन गार्डनवर वन डे मॅचमध्ये पाकिस्ताननं भारतावर 85 रन्सनं मात केलीय आणि तीन वन डे मॅचची ही सीरिजही 2-0 अशी जिंकलीय. नासिर जमशेदनं केलेल्या सेंच्युरीच्या जोरावर पाकिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 251 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. पण याला उत्तर देताना भारताची टीम अवघ्या 165 रन्सवर ऑलआऊट झाली. ईडन गार्डनवर पाकचा विजय रथ रोखण्यास धोणी बिग्रेड सपेशल अपयश ठरलीय. ईडन गार्डनवर भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने निर्धारीत 50 ओव्हरमध्ये दमदार बॅटिंग करत 250 रन्सवर ऑलआऊट झाली.ओपनिंगला आलेल्या नासिर जमशेदनं शानदार सेंच्युरी ठोकली. या वन डे सीरिजमध्ये जमशेदची ही सलग दुसरी सेंच्युरी ठरलीय. पण यानंतर 106 रन्सवर तो आऊट झाला. नासिर जमशेद आणि मोहम्मद हाफीजनं पहिल्या विकेटसाठी 141 रन्सची पार्टनरशिप करत पाकिस्तानला दमदार सुरुवात करुन दिली. रविंद्र जडेजानं हाफीजला आऊट करत ही जोडी फोडली. यानंतर अझहर अली, मिसबाह-उल-हक, युनुस खान आणि कामरान खान झटपट आऊट झाले. ईशांत आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. 251 धावांचा पाठलाग करणार्‍या टीम इंडियाने सावध सुरूवात केली पण अतिसावधपणा पराभवाला कारणीभूत ठरला. भारताचे स्टार फलंदाज एकापाठोपाठ तंबूत परतले. एकट्या धोणींने शेवटपर्यंत कर्णधारपदाचा डोलारा सांभाळात शेवटच्या विकेटपर्यंत मैदानात झुंजला. त्याने सर्वाधिक 54 रन्स केले. पण शिलेदाराविना राजा अशीच अवस्था धोणीची झाली. गौतम गंभीर 11 रन्स, विरेंद्र सेहवाग 31, विराट कोहली 6, युवराज सिंग 9 आणि सुरेश रैना 18 रन्सचं करू शकले. पाककडून जुनेद खान आणि सईद अजमल यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. पाकिस्तानच्या बॉलिंगसमोर भारताच्या एकाही बॅट्समनला मोठा स्कोर करता आला नाही. सईद अजमलनं एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट घेत भारताची शेपुट गुंडाळली. विशेष म्हणजे कोलकाताच्या ईडन गार्डनवर भारताला पाकिस्तानविरुद्ध एकही मॅच जिंकता आलेली नाही आणि पराभवाची हीच परंपरा भारतानं या मॅचमध्येही कायम राखली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2013 02:28 PM IST

लाज गेली, मालिकाही गेली

03 जानेवारी

भारतीय क्रिकेट टीमची नव्या वर्षाची सुरुवातही पराभवानं झाली. कोलकाता इथं ईडन गार्डनवर वन डे मॅचमध्ये पाकिस्ताननं भारतावर 85 रन्सनं मात केलीय आणि तीन वन डे मॅचची ही सीरिजही 2-0 अशी जिंकलीय. नासिर जमशेदनं केलेल्या सेंच्युरीच्या जोरावर पाकिस्ताननं भारतासमोर विजयासाठी 251 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. पण याला उत्तर देताना भारताची टीम अवघ्या 165 रन्सवर ऑलआऊट झाली. ईडन गार्डनवर पाकचा विजय रथ रोखण्यास धोणी बिग्रेड सपेशल अपयश ठरलीय.

ईडन गार्डनवर भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने निर्धारीत 50 ओव्हरमध्ये दमदार बॅटिंग करत 250 रन्सवर ऑलआऊट झाली.ओपनिंगला आलेल्या नासिर जमशेदनं शानदार सेंच्युरी ठोकली. या वन डे सीरिजमध्ये जमशेदची ही सलग दुसरी सेंच्युरी ठरलीय. पण यानंतर 106 रन्सवर तो आऊट झाला. नासिर जमशेद आणि मोहम्मद हाफीजनं पहिल्या विकेटसाठी 141 रन्सची पार्टनरशिप करत पाकिस्तानला दमदार सुरुवात करुन दिली. रविंद्र जडेजानं हाफीजला आऊट करत ही जोडी फोडली. यानंतर अझहर अली, मिसबाह-उल-हक, युनुस खान आणि कामरान खान झटपट आऊट झाले. ईशांत आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

251 धावांचा पाठलाग करणार्‍या टीम इंडियाने सावध सुरूवात केली पण अतिसावधपणा पराभवाला कारणीभूत ठरला. भारताचे स्टार फलंदाज एकापाठोपाठ तंबूत परतले. एकट्या धोणींने शेवटपर्यंत कर्णधारपदाचा डोलारा सांभाळात शेवटच्या विकेटपर्यंत मैदानात झुंजला. त्याने सर्वाधिक 54 रन्स केले. पण शिलेदाराविना राजा अशीच अवस्था धोणीची झाली. गौतम गंभीर 11 रन्स, विरेंद्र सेहवाग 31, विराट कोहली 6, युवराज सिंग 9 आणि सुरेश रैना 18 रन्सचं करू शकले. पाककडून जुनेद खान आणि सईद अजमल यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. पाकिस्तानच्या बॉलिंगसमोर भारताच्या एकाही बॅट्समनला मोठा स्कोर करता आला नाही. सईद अजमलनं एकाच ओव्हरमध्ये तीन विकेट घेत भारताची शेपुट गुंडाळली. विशेष म्हणजे कोलकाताच्या ईडन गार्डनवर भारताला पाकिस्तानविरुद्ध एकही मॅच जिंकता आलेली नाही आणि पराभवाची हीच परंपरा भारतानं या मॅचमध्येही कायम राखली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2013 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close