S M L

गोंदियात नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात पंधरा दिवसात 5 ठार

05 जानेवारीगोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी तालुक्यातील भिवखिडकी गावात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातलाय. येथील रहिवासी भाग्यश्री नेवारे या तरुणीला वाघाने ठार केलंय. या भागातील गेल्या पंधरा दिवसातली ही पाचवी घटना असुन अजूनही वनविभाग या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात अपयशी ठरलाय. शेतात काम करणार्‍या तसंच सरपणासाठी जंगलातून लाकडं आणायला गेलेल्या महिलांवर या वाघाने हल्ला करुन त्यांना ठार केलंय. वाघाच्या दहशतीने या परिसरातील लोक घराबाहेरच पडत नाहीत. वन विभागाने वाघाला पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावलेत पण अजून त्यांना यश आलं नाही. त्यामुळे संतप्त गावकर्‍यांनी तहसिलदार कार्यलयावर मोर्चा काढला आणि निदर्शनं केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2013 10:28 AM IST

गोंदियात नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात पंधरा दिवसात 5 ठार

05 जानेवारी

गोंदिया जिल्ह्यातल्या अर्जुनी तालुक्यातील भिवखिडकी गावात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातलाय. येथील रहिवासी भाग्यश्री नेवारे या तरुणीला वाघाने ठार केलंय. या भागातील गेल्या पंधरा दिवसातली ही पाचवी घटना असुन अजूनही वनविभाग या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात अपयशी ठरलाय. शेतात काम करणार्‍या तसंच सरपणासाठी जंगलातून लाकडं आणायला गेलेल्या महिलांवर या वाघाने हल्ला करुन त्यांना ठार केलंय. वाघाच्या दहशतीने या परिसरातील लोक घराबाहेरच पडत नाहीत. वन विभागाने वाघाला पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावलेत पण अजून त्यांना यश आलं नाही. त्यामुळे संतप्त गावकर्‍यांनी तहसिलदार कार्यलयावर मोर्चा काढला आणि निदर्शनं केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2013 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close