S M L

नाट्य संमेलनाचा 'पडदा पडला'

23 डिसेंबरबारामतीमध्ये झालेल्या 93 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा आज समारोप झाला. या वेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दोन दिवसात झालेल्या या नाट्यसंमेलनात बारामतीकरांनी चांगला प्रतिसाद दिला.बारामतीकरांना थंडीत चांगलीच नाट्य मेजवानी मिळाली. शनिवारी मोठ्या दिमाखात नाट्यसंमेलनाचे उद्धघाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही हजर होते. नाट्यसंमेलनाच्या पहिल्या दिवशीच राजकीय टोलेबाजी नाट्य रसिकांना पाह्यायला मिळाली. स्वागतध्यक्ष अजित पवार यांनी नाट्य संमेलनाला निधी देण्यासाठी अर्थ आणि ऊर्जा खाते द्यावे अशी मागणी केल्यामुळे उपस्थित रसिकमंडळ अवाक् झाले. तर यानंतर मुख्यमंत्र्यांनी अजितदादा गेले ते त्यांच्या मर्जीने आणि त्यांच्याच मर्जीने परत आले. यात मात्र आम्हाला विश्वासात घेतलं नाही असा टोला लगावला. यानंतर शरद पवार यांनी अजितदादांची बाजू घेत मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात घ्यावं हा राष्ट्रवादी पक्ष आहे. इथं तुमच्या संघटनेसारखी दिल्लीतून ऑर्डर येतं नाही असा प्रतिटोला लगावला. आंदोलनाचे दोन दिवस मोठ्या रंगदार सोहळ्यात पार पडले. आता पुढच्या वर्षी हे नाट्यसंमेलन कुठे असेल याबद्दल उत्सुक्ता नाट्यरसिकांमध्ये आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2012 02:27 PM IST

नाट्य संमेलनाचा 'पडदा पडला'

23 डिसेंबर

बारामतीमध्ये झालेल्या 93 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा आज समारोप झाला. या वेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, संमेलनाध्यक्ष डॉ. मोहन आगाशे, प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दोन दिवसात झालेल्या या नाट्यसंमेलनात बारामतीकरांनी चांगला प्रतिसाद दिला.बारामतीकरांना थंडीत चांगलीच नाट्य मेजवानी मिळाली. शनिवारी मोठ्या दिमाखात नाट्यसंमेलनाचे उद्धघाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही हजर होते. नाट्यसंमेलनाच्या पहिल्या दिवशीच राजकीय टोलेबाजी नाट्य रसिकांना पाह्यायला मिळाली. स्वागतध्यक्ष अजित पवार यांनी नाट्य संमेलनाला निधी देण्यासाठी अर्थ आणि ऊर्जा खाते द्यावे अशी मागणी केल्यामुळे उपस्थित रसिकमंडळ अवाक् झाले. तर यानंतर मुख्यमंत्र्यांनी अजितदादा गेले ते त्यांच्या मर्जीने आणि त्यांच्याच मर्जीने परत आले. यात मात्र आम्हाला विश्वासात घेतलं नाही असा टोला लगावला. यानंतर शरद पवार यांनी अजितदादांची बाजू घेत मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात घ्यावं हा राष्ट्रवादी पक्ष आहे. इथं तुमच्या संघटनेसारखी दिल्लीतून ऑर्डर येतं नाही असा प्रतिटोला लगावला. आंदोलनाचे दोन दिवस मोठ्या रंगदार सोहळ्यात पार पडले. आता पुढच्या वर्षी हे नाट्यसंमेलन कुठे असेल याबद्दल उत्सुक्ता नाट्यरसिकांमध्ये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2012 02:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close