S M L

राजस्थान निवडणुकीत मूलभूत प्रश्नांना राजकारण्यांकडून बगल

3 डिसेंबर, राजस्थान राजस्थानमधील निवडणूक स्वच्छ पाण्याच्या प्रश्नाभोवती फिरतेय. पण राजकारणी मात्र राज्यात दारु विक्रीचा खप कसा वाढेल, याकडेच लक्ष देताना दिसत आहेत. गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी हातपंपाचा वापर करावा लागतो. हातपंप वापरल्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. ' सकाळी जेव्हा मी उठायचा प्रयत्न करते, तेव्हा माझ्या हातापायाचे सांधे दुखतात. मला बोलायचा सुद्धा त्रास होतो. मी फक्त 30 वर्षांची आहे. पण इथल्या दूषित पाण्यामुळे माझ वय जास्त वाटतंय ', असं गीता देवी सांगत होत्या. गीता देवी प्रमाणेच ही अवस्था संगनेर तसंच जयपूरमधील 100 गावातली आहे. पाण्यामध्ये फ्लोराईडचा वापर असल्यामुळे वयोवृध्दांबरोबर तरुणांना देखील सांधेदुखी आणि लवकर म्हातारपण यासारख्या समस्या भेडसावत आहेत. स्वच्छ पाण्याच्या त्यांच्या मागणीकडे मात्र यावेळी सुद्धा राजकारणी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. यावेळी दारुवरुन राजकीय वाद रंगताना दिसत आहेत. नव्या दारुच्या दुकानांना परवानगी दिल्यामुळे विरोधी पक्ष वसुंधरा राजेंवर टीका करताना दिसत आहेत. ' प्रत्येक रस्त्यावर चार ते पाच दुकानांची गरज काय आहे. त्याचबरोबर या सरकारने शाळा आणि धार्मिक स्थळांच्या बाजूलासुद्धा दारुच्या दुकानांची परवानगी दिलीय ' , असं मालवीया नगरचे काँग्रेस उमेदवार राजीव अरोरा सांगत होते. हा आरोप थेट वसुंधरा राजे सिंधीया यांच्यावर आहे. त्यांनी देखील दारुच्या विक्रीतून होणारा आर्थिक फायदा आम्ही समाजपयोगी कामांसाठी वापरतो, असं स्पष्ट केलंय. ' यातून येणार्‍या पैशाचा उपयोग आम्ही गरिबांना जेवण देण्यासाठी तसंच शहराच्या विकासकामांसाठी वापरतो' , असं वसुंधरा राजे सिंधीया म्हणाल्या. राजकीय नेते कोणत्याही मुद्यावर वाद घालत असले तरीही संगनेर आणि आसपासच्या गावातले मतदारांनी त्यानांच मतं देण्याचा निर्णय घेतलाय. जे त्यांच्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 4, 2008 02:38 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 4, 2008 02:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close