S M L

ज्येष्ठ समाजवादी नेते किशोर पवार यांचं निधन

02 जानेवारीज्येष्ठ समाजवादी नेते किशोर पवार यांचं आज पहाटे निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले ते अग्रणी नेते होते. स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्ती संग्राम आणि हैदराबाद मुक्ती संग्रामातला त्यांचा सहभाग मोलाचा होता. त्यांनी साखर कामगारांची पहिली यूनियन स्थापन केली होती. त्यांचं पार्थिव 11 ते 2 या वेळेत त्यांच्या सिंहगडमधल्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. तर दुपारी 2 ते संध्याकाळी 5 या वेळेत एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनमध्ये त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2013 11:14 AM IST

ज्येष्ठ समाजवादी नेते किशोर पवार यांचं निधन

02 जानेवारी

ज्येष्ठ समाजवादी नेते किशोर पवार यांचं आज पहाटे निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले ते अग्रणी नेते होते. स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्ती संग्राम आणि हैदराबाद मुक्ती संग्रामातला त्यांचा सहभाग मोलाचा होता. त्यांनी साखर कामगारांची पहिली यूनियन स्थापन केली होती. त्यांचं पार्थिव 11 ते 2 या वेळेत त्यांच्या सिंहगडमधल्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. तर दुपारी 2 ते संध्याकाळी 5 या वेळेत एस एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनमध्ये त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2013 11:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close