S M L

भारताचे पाकला 193 धावांचे आव्हान

28 डिसेंबरपाकिस्तानविरुद्धची पहिली टी 20 मॅच गमावल्यानंतर आज अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान दरम्यान दुसरी आणि शेवटची टी 20 मॅच रंगतेय. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन भारताला फलंदाजीची संधी दिली. भारताने निर्धारीत 20 ओव्हरमध्ये दमदार बॅटिंग करत 5 विकेट गमावत 192 धावा केल्या असून पाकला 193 धावांचे आव्हान दिले आहे. गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे या ओपनिंग जोडीने धडाकेबाज सुरूवात केली. मात्र 21 रन्सवर गौतम गंभीरला उमर गुलने एलबीडब्ल्यु आऊट केलं. त्यापाठोपाठ अजिंक्य रहाणेची कॅच घेऊन गुलने रहाणेला तंबूत पाठवले. त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि युवराज सिंगने टीम इंडियाची बाजू सावरली. युवराजने धडाकेबाज बॅटिंग करत 36 बॉलमध्ये 72 रन्स केले यात 4 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे. युवराजच्या या धडाकेबाज बॅटिंगच्या जोरावर टीम इंडियाला 192 धावांवर मजल मारता आली. युवराजने एकीकडे टीम इंडियाची बाजू भक्कम केली तर विराट कोहली 27 रन्स तर महेंद्र सिंग धोणी 33 रन्सवर आऊट झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2012 01:10 PM IST

भारताचे पाकला 193 धावांचे आव्हान

28 डिसेंबर

पाकिस्तानविरुद्धची पहिली टी 20 मॅच गमावल्यानंतर आज अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान दरम्यान दुसरी आणि शेवटची टी 20 मॅच रंगतेय. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन भारताला फलंदाजीची संधी दिली. भारताने निर्धारीत 20 ओव्हरमध्ये दमदार बॅटिंग करत 5 विकेट गमावत 192 धावा केल्या असून पाकला 193 धावांचे आव्हान दिले आहे. गौतम गंभीर आणि अजिंक्य रहाणे या ओपनिंग जोडीने धडाकेबाज सुरूवात केली. मात्र 21 रन्सवर गौतम गंभीरला उमर गुलने एलबीडब्ल्यु आऊट केलं. त्यापाठोपाठ अजिंक्य रहाणेची कॅच घेऊन गुलने रहाणेला तंबूत पाठवले. त्यानंतर आलेल्या विराट कोहली आणि युवराज सिंगने टीम इंडियाची बाजू सावरली. युवराजने धडाकेबाज बॅटिंग करत 36 बॉलमध्ये 72 रन्स केले यात 4 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश आहे. युवराजच्या या धडाकेबाज बॅटिंगच्या जोरावर टीम इंडियाला 192 धावांवर मजल मारता आली. युवराजने एकीकडे टीम इंडियाची बाजू भक्कम केली तर विराट कोहली 27 रन्स तर महेंद्र सिंग धोणी 33 रन्सवर आऊट झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2012 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close