S M L

थर्टीफस्ट नाईट, पोलिसांचा बंदोबस्त टाईट

31 डिसेंबरथर्टीफस्टच्या सेलिब्रेशन्ससाठी मुंबई पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवलाय. गेट वे ऑफ इंडिया, जुहू बीच आणि गिरगाव चौपाटीवर होणारी गर्दी लक्षात घेत विशेष काळजी घेतली जातेय. पोलिसांची फिरती पथकं वेगवेगळ्या ठिकाणच्या पाटर्‌यावर लक्ष ठेवून असेल. वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस सतत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवर नजर ठेवून असतील. भाभा अणुसंशोधन केंद्र, विमानतळ, मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तब्बल 48 हजार पोलीस दोन शिफ्ट्समध्ये तैनात असणार आहे. तसंच मद्यप्राशान करून बेभान होऊन गाड्या चालवण्यार्‍या मद्यपी चालकांविरुद्धही कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय यासाठी एक विशेष मोहिम आखण्यात आलीय. यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांचे 52 डिव्हिजन तयार करण्यात आले असून प्रत्येक डिव्हिजनमध्ये 8 ते 10 ठिकाणी ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह तपासणीसाठी पॉईंट असणार आहे. तसेच म्400 ते 500 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2012 03:29 PM IST

थर्टीफस्ट नाईट, पोलिसांचा बंदोबस्त टाईट

31 डिसेंबर

थर्टीफस्टच्या सेलिब्रेशन्ससाठी मुंबई पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवलाय. गेट वे ऑफ इंडिया, जुहू बीच आणि गिरगाव चौपाटीवर होणारी गर्दी लक्षात घेत विशेष काळजी घेतली जातेय. पोलिसांची फिरती पथकं वेगवेगळ्या ठिकाणच्या पाटर्‌यावर लक्ष ठेवून असेल. वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस सतत सीसीटीव्ही कॅमेर्‍यांवर नजर ठेवून असतील. भाभा अणुसंशोधन केंद्र, विमानतळ, मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जादा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तब्बल 48 हजार पोलीस दोन शिफ्ट्समध्ये तैनात असणार आहे. तसंच मद्यप्राशान करून बेभान होऊन गाड्या चालवण्यार्‍या मद्यपी चालकांविरुद्धही कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाय यासाठी एक विशेष मोहिम आखण्यात आलीय. यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांचे 52 डिव्हिजन तयार करण्यात आले असून प्रत्येक डिव्हिजनमध्ये 8 ते 10 ठिकाणी ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह तपासणीसाठी पॉईंट असणार आहे. तसेच म्400 ते 500 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2012 03:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close