S M L

जैतापूर प्रकल्पाविरोधात प्रकल्पग्रस्तांचं जेलभरो आंदोलन

02 जानेवारीजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आज पुन्हा एकदा हजारोंच्या संख्येने साखरी नाटे इथले मच्छीमार आणि प्रकल्पग्रस्तांनी जेलभरो आंदोलन केलं. अणु उर्जा प्रकल्प उभारणार्‍या अरेवा या कंपनीचा लवकरच एनपीसीआयएलशी प्राथमिक करार होणार आहे. याचा निषेध करत प्रकल्पाच्या विरोधात साखरी नाटेतल्या सुमारे 3 हजार लोकांनी मच्छीमारांसह शांततेत जेलभरो आंदोलन केलं. माडबन मधल्या प्रकल्पग्रस्तही या आंदोलनात सहभागी झाले होते. तसंच शिवसेना, आरपीआय आणि सीपीआयचे कार्यकर्तेही या आंदोलनात उतरले. आंदोलकांना प्रकल्पस्थळी जाण्यास मज्जाव केलेला असल्यामुळे साखरी नाटेतून निघालेल्या या आंदोलकांनी सहाकिलोमीटर पायी चालत जाऊन स्वत:ला अटक करून घेतली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2013 02:24 PM IST

जैतापूर प्रकल्पाविरोधात प्रकल्पग्रस्तांचं जेलभरो आंदोलन

02 जानेवारी

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आज पुन्हा एकदा हजारोंच्या संख्येने साखरी नाटे इथले मच्छीमार आणि प्रकल्पग्रस्तांनी जेलभरो आंदोलन केलं. अणु उर्जा प्रकल्प उभारणार्‍या अरेवा या कंपनीचा लवकरच एनपीसीआयएलशी प्राथमिक करार होणार आहे. याचा निषेध करत प्रकल्पाच्या विरोधात साखरी नाटेतल्या सुमारे 3 हजार लोकांनी मच्छीमारांसह शांततेत जेलभरो आंदोलन केलं. माडबन मधल्या प्रकल्पग्रस्तही या आंदोलनात सहभागी झाले होते. तसंच शिवसेना, आरपीआय आणि सीपीआयचे कार्यकर्तेही या आंदोलनात उतरले. आंदोलकांना प्रकल्पस्थळी जाण्यास मज्जाव केलेला असल्यामुळे साखरी नाटेतून निघालेल्या या आंदोलकांनी सहाकिलोमीटर पायी चालत जाऊन स्वत:ला अटक करून घेतली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2013 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close