S M L

प्रेयसीवर बलात्कार करून प्रियकराने केला खून

28 डिसेंबरठाणे जिल्ह्यातील वसईतील वालीव भागात 18 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खून केल्याची घटना घडलीय. मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्याच प्रियकराने बलात्कार करून खून केल्याचं पोलीस तपासातून निष्पण झालंय. पंकज कुमार असं या आरोपीच नाव असून पोलिसांनी त्याला अटक केलीय. वसईतील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पंकजच्या मावशीच्या घरी मृत मुलगी आली असता तिला लग्नाची मागणी केली. मुलीने लग्नाला नकार दिल्याने पंकजने तिच्यावर बलात्कार करुन गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी आधी या प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मुलीच्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला होता. पोस्टमॉर्टमच्या अहवालात बलात्कार आणि गळा दाबून खून केल्याच उघड झाल्यानंतर वालीव पोलिसांनी पंकजला अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2012 02:10 PM IST

प्रेयसीवर बलात्कार करून प्रियकराने केला खून

28 डिसेंबर

ठाणे जिल्ह्यातील वसईतील वालीव भागात 18 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खून केल्याची घटना घडलीय. मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून तिच्याच प्रियकराने बलात्कार करून खून केल्याचं पोलीस तपासातून निष्पण झालंय. पंकज कुमार असं या आरोपीच नाव असून पोलिसांनी त्याला अटक केलीय. वसईतील वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पंकजच्या मावशीच्या घरी मृत मुलगी आली असता तिला लग्नाची मागणी केली. मुलीने लग्नाला नकार दिल्याने पंकजने तिच्यावर बलात्कार करुन गळा दाबून हत्या केली. पोलिसांनी आधी या प्रकरणात आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मुलीच्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला होता. पोस्टमॉर्टमच्या अहवालात बलात्कार आणि गळा दाबून खून केल्याच उघड झाल्यानंतर वालीव पोलिसांनी पंकजला अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2012 02:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close