S M L

दिल्ली गँगरेप : 5 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल

03 जानेवारीदिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज साकेत कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. 6 पैकी 5 आरोपींविरोधात सीलबंद आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. आरोपींवर सामूहिक बलात्कार, खून, अपहरण, पुरावे नष्ट करणं यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा खटला इन-कॅमेरा चालणार आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात येत्या दोन दिवसांत खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे. सहावा आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याचा खटला जुवेनाईल कोर्टात चालणार आहे. त्यासाठी जुवेनाईल कोर्टात वेगळी चार्जशीट दाखल केली जाणार आहे. ज्युवेनाईल ऍक्टनुसार त्याला कडक शिक्षा होऊ शकत नाही. पण गुन्हा गंभीर असल्यानं ज्युवेनाईल ऍक्टमध्येच सुधारणा व्हाव्यात, अशी मागणी आता सुरू झालीय. मूळ चार्जशीटमध्ये या प्रकरणातल्या बहादूर मुलीचं नाव नोंदवण्यात आलंय. पण चार्जशीटच्या प्रतींमध्ये मात्र नावाचा उल्लेख केलेला नाहीय. दरम्यान, बहादूर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या चार्जशीटवर समाधान व्यक्त केलंय. ही चार्जशीट कशी आहे ?कलम 302 - खूनकलम 276 - सामूहिक बलात्कारकलम 377 - अनैसर्गिक गुन्हाकलम 201 - पुरावे नष्ट करणंकलम 307 -खुनाचा प्रयत्नकलम 365 - अपहरणकलम 396 - दरोडा

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2013 05:10 PM IST

दिल्ली गँगरेप : 5 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल

03 जानेवारी

दिल्लीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आज साकेत कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. 6 पैकी 5 आरोपींविरोधात सीलबंद आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. आरोपींवर सामूहिक बलात्कार, खून, अपहरण, पुरावे नष्ट करणं यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा खटला इन-कॅमेरा चालणार आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात येत्या दोन दिवसांत खटल्याची सुनावणी सुरू होणार आहे. सहावा आरोपी अल्पवयीन असल्यानं त्याचा खटला जुवेनाईल कोर्टात चालणार आहे. त्यासाठी जुवेनाईल कोर्टात वेगळी चार्जशीट दाखल केली जाणार आहे. ज्युवेनाईल ऍक्टनुसार त्याला कडक शिक्षा होऊ शकत नाही. पण गुन्हा गंभीर असल्यानं ज्युवेनाईल ऍक्टमध्येच सुधारणा व्हाव्यात, अशी मागणी आता सुरू झालीय. मूळ चार्जशीटमध्ये या प्रकरणातल्या बहादूर मुलीचं नाव नोंदवण्यात आलंय. पण चार्जशीटच्या प्रतींमध्ये मात्र नावाचा उल्लेख केलेला नाहीय. दरम्यान, बहादूर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांच्या चार्जशीटवर समाधान व्यक्त केलंय.

ही चार्जशीट कशी आहे ?

कलम 302 - खूनकलम 276 - सामूहिक बलात्कारकलम 377 - अनैसर्गिक गुन्हाकलम 201 - पुरावे नष्ट करणंकलम 307 -खुनाचा प्रयत्नकलम 365 - अपहरणकलम 396 - दरोडा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2013 05:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close