S M L

कोल्हापुरात खंडणीसाठी अपह्रत मुलाची हत्या

26 डिसेंबरकोल्हापूरमध्ये खंडणीसाठी एका 10 वर्षाच्या मुलाचा अपहरण करुन खून करण्यात आल्याची घटना घडलीय. शहरातल्या देवकर पाणंद परिसरातल्या या घटनेनं शहरासह जिल्ह्यात खळबळ उडालीय. दर्शन रोहीत शहा असं या मुलाचं नाव आहे. 3 दिवसांपूर्वी या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर मंगळवारी त्याच्या पालकांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्यादही दिली होती. मात्र आज सकाळी सुश्रूषानगरमधल्या एका विहीरीत या मुलाचा मृतदेह सापडला. दर्शनच्या वडिलांचा कपाड्याचा व्यवसाय आहे. दर्शन हा त्यांचा एकूलता एक मुलगा होता. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी शहा यांच्या घरी एक चिठ्ठीही टाकली होती. ही चिठ्ठी आज सापडलीय. ही चिठ्ठी हिंदी भाषेत असून त्यामधून 25 तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची आणि रोख रक्कमेची मागणी करण्यात आलीय. हिंदी चिठ्ठीमुळं अपहरणकर्ते हे परप्रांतिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. तर श्वानपथकाच्या सहाय्याने आणि त्या चिठ्ठीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केलाय. जेव्हा विहीरीतून दर्शनचा मृतदेह काढण्यात आला तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या आक्रोशानं तिथला परिसर सुन्न झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2012 01:55 PM IST

कोल्हापुरात खंडणीसाठी अपह्रत मुलाची हत्या

26 डिसेंबर

कोल्हापूरमध्ये खंडणीसाठी एका 10 वर्षाच्या मुलाचा अपहरण करुन खून करण्यात आल्याची घटना घडलीय. शहरातल्या देवकर पाणंद परिसरातल्या या घटनेनं शहरासह जिल्ह्यात खळबळ उडालीय. दर्शन रोहीत शहा असं या मुलाचं नाव आहे. 3 दिवसांपूर्वी या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर मंगळवारी त्याच्या पालकांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्यादही दिली होती. मात्र आज सकाळी सुश्रूषानगरमधल्या एका विहीरीत या मुलाचा मृतदेह सापडला. दर्शनच्या वडिलांचा कपाड्याचा व्यवसाय आहे. दर्शन हा त्यांचा एकूलता एक मुलगा होता. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी शहा यांच्या घरी एक चिठ्ठीही टाकली होती. ही चिठ्ठी आज सापडलीय. ही चिठ्ठी हिंदी भाषेत असून त्यामधून 25 तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची आणि रोख रक्कमेची मागणी करण्यात आलीय. हिंदी चिठ्ठीमुळं अपहरणकर्ते हे परप्रांतिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय. तर श्वानपथकाच्या सहाय्याने आणि त्या चिठ्ठीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केलाय. जेव्हा विहीरीतून दर्शनचा मृतदेह काढण्यात आला तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी केलेल्या आक्रोशानं तिथला परिसर सुन्न झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2012 01:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close