S M L

शरद पवारांकडून मंत्र्यांची झाडाझडती

07 जानेवारीराज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी अध्यक्ष शरद पवारांनी बैठक बोलावलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक सुरू आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्री सहभागी झाले आहेत. प्रत्येक मंत्र्याला आपल्या विभागाचा लेखाजोखा शरद पवारांसमोर मांडावा लागणार आहे. मंत्रिमंडळाबरोबरच मतदारसंघाच्या विभागातली संबंधित मंत्र्याची कामगिरी शरद पवार तपासून पाहणार आहेत. बहुतेक मंत्री पक्ष वाढवण्याच्या कामात कमी पडतायत अशी शरद पवारांची तक्रार आहे. आजच्या बैठकीतून शरद पवार ज्या चार मंत्र्यांना वगळायचे आहे. त्यांची नावं निश्चित करू शकतात अशीही चर्चा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2013 09:08 AM IST

शरद पवारांकडून मंत्र्यांची झाडाझडती

07 जानेवारी

राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. त्यातच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी अध्यक्ष शरद पवारांनी बैठक बोलावलीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक सुरू आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्री सहभागी झाले आहेत. प्रत्येक मंत्र्याला आपल्या विभागाचा लेखाजोखा शरद पवारांसमोर मांडावा लागणार आहे. मंत्रिमंडळाबरोबरच मतदारसंघाच्या विभागातली संबंधित मंत्र्याची कामगिरी शरद पवार तपासून पाहणार आहेत. बहुतेक मंत्री पक्ष वाढवण्याच्या कामात कमी पडतायत अशी शरद पवारांची तक्रार आहे. आजच्या बैठकीतून शरद पवार ज्या चार मंत्र्यांना वगळायचे आहे. त्यांची नावं निश्चित करू शकतात अशीही चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2013 09:08 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close