S M L

'आगीतून फुफाट्यात', पालिकेचा भोंगळ कारभार

08 जानेवारीएखाद्या कंत्राटदारानं भ्रष्टाचार केल्याचं महापालिकेनेचं दिलेल्या अहवालात मान्य केलं. त्यांच्याकडून दंडापोटी साडेसतरा कोटी रुपये वसूल करण्याच्या सुचनासुद्धा महापालिकेनंचं दिल्या. आणि तरीही त्याच कंत्राटदारांना पुन्हा नव्यानं तीन वर्षासाठी कंत्राट देण्यात आल्याचा अजब प्रकार मुंबई महापालिकेत घडलाय.डिसेंबर 2008 ला महापालिकेच्या शाळा स्वच्छ आणि सुरक्षित रहाव्यात यासाठी पालिकेनं 117 कोटीचं कंत्राट दिलं. तीन वर्षासाठी हे कंत्राट होतं. कंत्राटात झालेल्या भ्रष्टाचारामुळे संबंधित कंत्राटदाराकडून साडेसतरा कोटी रुपये वसूल करण्यात यावेत असा ताशेरा टाहो या संस्थेनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. मात्र आजपर्यंत ही रक्कम संबंधित कंत्राटदारारकडून वसूल करण्यात आलेले नाहीत. क्रिस्टल ट्रेडकॉम आणि बीव्हीजे या कंत्राटजारांना हे काम देण्यात आलाय. कंत्राटातला भ्रष्टाचार विजय कुर्ले या सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड केलाय. 26 हजार पाचशे रुपये प्रत्येकी सुरक्षारक्षकांसाठी देते. त्यापैकी प्रत्यक्ष काम करणार्‍या सुरक्षारक्षकांना साडेपाच ते सहा हजार मिळतात. टाहो या पालिकेनं नेमलेल्या संस्थेनं दिलेल्या अहवालात पालिकेनं केलेला भ्रष्टाचार मान्य केलाय. बारा तासासाठी नेमलेले सुरक्षा रक्षक हे प्रत्यक्षात आठ तास काम करत होते. मात्र गंभीर बाब कंत्राटदाराकडून ही रक्कम वसूल करणं राहिलं बाजुला पुन्हा त्याच कंत्राटदारांना महापालिकेनं तीन वर्षासाठी काम दिलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2013 03:00 PM IST

'आगीतून फुफाट्यात', पालिकेचा भोंगळ कारभार

08 जानेवारी

एखाद्या कंत्राटदारानं भ्रष्टाचार केल्याचं महापालिकेनेचं दिलेल्या अहवालात मान्य केलं. त्यांच्याकडून दंडापोटी साडेसतरा कोटी रुपये वसूल करण्याच्या सुचनासुद्धा महापालिकेनंचं दिल्या. आणि तरीही त्याच कंत्राटदारांना पुन्हा नव्यानं तीन वर्षासाठी कंत्राट देण्यात आल्याचा अजब प्रकार मुंबई महापालिकेत घडलाय.

डिसेंबर 2008 ला महापालिकेच्या शाळा स्वच्छ आणि सुरक्षित रहाव्यात यासाठी पालिकेनं 117 कोटीचं कंत्राट दिलं. तीन वर्षासाठी हे कंत्राट होतं. कंत्राटात झालेल्या भ्रष्टाचारामुळे संबंधित कंत्राटदाराकडून साडेसतरा कोटी रुपये वसूल करण्यात यावेत असा ताशेरा टाहो या संस्थेनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. मात्र आजपर्यंत ही रक्कम संबंधित कंत्राटदारारकडून वसूल करण्यात आलेले नाहीत. क्रिस्टल ट्रेडकॉम आणि बीव्हीजे या कंत्राटजारांना हे काम देण्यात आलाय. कंत्राटातला भ्रष्टाचार विजय कुर्ले या सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड केलाय. 26 हजार पाचशे रुपये प्रत्येकी सुरक्षारक्षकांसाठी देते. त्यापैकी प्रत्यक्ष काम करणार्‍या सुरक्षारक्षकांना साडेपाच ते सहा हजार मिळतात. टाहो या पालिकेनं नेमलेल्या संस्थेनं दिलेल्या अहवालात पालिकेनं केलेला भ्रष्टाचार मान्य केलाय. बारा तासासाठी नेमलेले सुरक्षा रक्षक हे प्रत्यक्षात आठ तास काम करत होते. मात्र गंभीर बाब कंत्राटदाराकडून ही रक्कम वसूल करणं राहिलं बाजुला पुन्हा त्याच कंत्राटदारांना महापालिकेनं तीन वर्षासाठी काम दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2013 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close