S M L

कोल्हापुरात रेशन सबसिडीविरोधात विराट मोर्चा

02 जानेवारीरेशन धान्यावरची सबसिडी रद्द करा अशी मागणी करत रेशन बचाव समितीनं आज कोल्हापुरमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सुमारे 10 हजार नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. रॉकेलसह अन्नधान्यावरची सबसिडी तात्काळ रद्द करा, रेशनवरच्या सर्व वस्तू द्या, वर्षाला 12 गॅस सिलिंडर द्या, रेशन धान्य परवाना धारकांना सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. शहरातल्या मिरजकर तिकटी परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली होती. तर आंदोलनकर्त्यांची संख्या जास्त असल्याने मोर्चावेळी शहरातली वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष धनंजय महाडिक, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी, कॉ. चंद्रकांत यादव यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2013 01:41 PM IST

कोल्हापुरात रेशन सबसिडीविरोधात विराट मोर्चा

02 जानेवारी

रेशन धान्यावरची सबसिडी रद्द करा अशी मागणी करत रेशन बचाव समितीनं आज कोल्हापुरमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सुमारे 10 हजार नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. रॉकेलसह अन्नधान्यावरची सबसिडी तात्काळ रद्द करा, रेशनवरच्या सर्व वस्तू द्या, वर्षाला 12 गॅस सिलिंडर द्या, रेशन धान्य परवाना धारकांना सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. शहरातल्या मिरजकर तिकटी परिसरातून या मोर्चाला सुरुवात झाली होती. तर आंदोलनकर्त्यांची संख्या जास्त असल्याने मोर्चावेळी शहरातली वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष धनंजय महाडिक, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी, कॉ. चंद्रकांत यादव यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2013 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close