S M L

म.रे. अजूनही रडे, मुंबईकरांचे अतोनात हाल

02 जानेवारीशनिवारपासून कोलमडलेली मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही रुळावर आलेली नाही. सलग पाचव्या दिवशीही लोकलचा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. आजही लोकल 40 ते 50 मिनिटं उशिरा धावत आहेत. संध्याकाळची वेळ असल्यानं घराकडे निघालालेल्या चाकरमान्यांना हाल झालेत. हाच त्रास सकाळी कामाला जातानाही प्रवाशांना सहन करावा लागतोय. त्यामुळे अनेक मुंबईकरांची नव्या वर्षाची सुरुवात लेट मार्कनं झालीय. रेल्वेच्या मेगाब्लॉकचे आतापर्यंत चार बळी गेलेत. बळी गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, तसंच रेल्वे लवकर पूर्वपदावर आली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2013 03:08 PM IST

म.रे. अजूनही रडे, मुंबईकरांचे अतोनात हाल

02 जानेवारी

शनिवारपासून कोलमडलेली मध्य रेल्वेची वाहतूक अजूनही रुळावर आलेली नाही. सलग पाचव्या दिवशीही लोकलचा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय. आजही लोकल 40 ते 50 मिनिटं उशिरा धावत आहेत. संध्याकाळची वेळ असल्यानं घराकडे निघालालेल्या चाकरमान्यांना हाल झालेत. हाच त्रास सकाळी कामाला जातानाही प्रवाशांना सहन करावा लागतोय. त्यामुळे अनेक मुंबईकरांची नव्या वर्षाची सुरुवात लेट मार्कनं झालीय. रेल्वेच्या मेगाब्लॉकचे आतापर्यंत चार बळी गेलेत. बळी गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, तसंच रेल्वे लवकर पूर्वपदावर आली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2013 03:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close