S M L

नितीन गडकरींची अध्यक्षपदाची दुसरी टर्म निश्चित

04 जानेवारीनितीन गडकरी यांची पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती जवळपास निश्चित झाल्याची माहिती आयबीएन नेटवर्कच्या सूत्रांनी दिली आहे. पक्षाध्यक्षपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं गडकरींच्या नावाचा आग्रह धरल्याचं समजतंय. लालकृष्ण अडवाणींसह इतर नेत्यांनी गडकरींच्या दुसर्‍या टर्मला विरोध केलाय. पूर्ती ग्रुपमधील बेनामी कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या आरोपांमुळे गडकरींना दुसर्‍यांदा पक्षाध्यक्ष करू नये असा मतप्रवाह भाजपमध्येच आहे. पण पक्षाध्यक्षपदासाठी अजून दुसरं कोणतंही नाव चर्चेत आलेलं नाही. पूर्ती ग्रुपमध्ये घोटाळे उघड झाले होते त्यावेळीही संघाने गडकरींची पाठराखण केली होती. संघाच्या दबावामुळे भाजपलाही नमत घ्यावं लागलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2013 10:19 AM IST

नितीन गडकरींची अध्यक्षपदाची दुसरी टर्म निश्चित

04 जानेवारी

नितीन गडकरी यांची पक्षाच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती जवळपास निश्चित झाल्याची माहिती आयबीएन नेटवर्कच्या सूत्रांनी दिली आहे. पक्षाध्यक्षपदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं गडकरींच्या नावाचा आग्रह धरल्याचं समजतंय. लालकृष्ण अडवाणींसह इतर नेत्यांनी गडकरींच्या दुसर्‍या टर्मला विरोध केलाय. पूर्ती ग्रुपमधील बेनामी कंपन्यांच्या गुंतवणुकीच्या आरोपांमुळे गडकरींना दुसर्‍यांदा पक्षाध्यक्ष करू नये असा मतप्रवाह भाजपमध्येच आहे. पण पक्षाध्यक्षपदासाठी अजून दुसरं कोणतंही नाव चर्चेत आलेलं नाही. पूर्ती ग्रुपमध्ये घोटाळे उघड झाले होते त्यावेळीही संघाने गडकरींची पाठराखण केली होती. संघाच्या दबावामुळे भाजपलाही नमत घ्यावं लागलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2013 10:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close