S M L

पाक सैनिकांकडून पुन्हा गोळीबार

10 जानेवारीभारत पाकिस्तान सीमेवरच्या गोळीबारानंतर भारत-पाकिस्तानच्या संबंधांमध्ये आता आणखी कटुता आलीय. पूंछमध्ये सीवेमर पाकिस्तानी सैन्यांनी पुन्हा गोळीबार केल्याचा दावा भारतानं केलाय. पूंछ आणि मेंढारमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय सैनिकांनीही उत्तर दिलं. हा गोळीबार तब्बल दोन तास सुरू होता. तर तट्टापाणी भागात आपला एका सैनिक मारला गेल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय. त्यानंतर जम्मूतल्या चाकण दा बागमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी मालानं भरलेल्या भारतीय ट्रकसाठी गेट उघडायला नकार दिला. आणि दोन कोटींचा नाशवंत भारतीय माल परत पाठवला. अचानकनपणे केलेल्या या एकतर्फी कृत्याचं पाकिस्तानी सैनिकांनी दिलं नाहीय. पण सीमेवर झालेल्या घटनेशी याचा काहीच संबंध नसल्याचं पाकिस्तानच्या वाणिज्य मंत्र्यांनी म्हटलंय. दुसरीकडे भारतानं मात्र संयमाची भूमिका घेतलीय. भारत-पाकमधल्या व्हिसा पॉलिसीत कोणताच बदल होणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलंय. पाकिस्तानच्या हॉकी खेळाडूंना दिलेला व्हिसा रद्द करण्यात येणार नाहीय.सीमेवर गोळीबाराचा महिन्याभरापुर्वीच रचला होता कट ?दरम्यान, सीमेवर हल्ला करण्याची योजना पाकिस्ताननं महिन्याभरापूर्वीच आखली होती अशी माहिती लष्करातल्या सूत्रांनी दिलीय. सीमेवर चेक पोस्टवर भारतीय सैनिकांच्या हालचाली, त्यांची संख्या आणि शस्त्रं या सगळ्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी बारीक लक्ष ठेवलं होतं. भारताच्या सुरक्षेमधल्या काही उणिवा पाकिस्तानी सैनिकांनी शोधून काढल्या. आणि त्यानुसार कट रचून हल्ला केला, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. आता भारतीय लष्कर सीमेवरची गस्त आणि शस्त्रांची संख्या वाढवणार आहे. तर सीमेवरची घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायला भारताचा विरोध आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2013 04:40 PM IST

पाक सैनिकांकडून पुन्हा गोळीबार

10 जानेवारी

भारत पाकिस्तान सीमेवरच्या गोळीबारानंतर भारत-पाकिस्तानच्या संबंधांमध्ये आता आणखी कटुता आलीय. पूंछमध्ये सीवेमर पाकिस्तानी सैन्यांनी पुन्हा गोळीबार केल्याचा दावा भारतानं केलाय. पूंछ आणि मेंढारमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय सैनिकांनीही उत्तर दिलं. हा गोळीबार तब्बल दोन तास सुरू होता. तर तट्टापाणी भागात आपला एका सैनिक मारला गेल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय.

त्यानंतर जम्मूतल्या चाकण दा बागमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी मालानं भरलेल्या भारतीय ट्रकसाठी गेट उघडायला नकार दिला. आणि दोन कोटींचा नाशवंत भारतीय माल परत पाठवला. अचानकनपणे केलेल्या या एकतर्फी कृत्याचं पाकिस्तानी सैनिकांनी दिलं नाहीय. पण सीमेवर झालेल्या घटनेशी याचा काहीच संबंध नसल्याचं पाकिस्तानच्या वाणिज्य मंत्र्यांनी म्हटलंय. दुसरीकडे भारतानं मात्र संयमाची भूमिका घेतलीय. भारत-पाकमधल्या व्हिसा पॉलिसीत कोणताच बदल होणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केलंय. पाकिस्तानच्या हॉकी खेळाडूंना दिलेला व्हिसा रद्द करण्यात येणार नाहीय.

सीमेवर गोळीबाराचा महिन्याभरापुर्वीच रचला होता कट ?

दरम्यान, सीमेवर हल्ला करण्याची योजना पाकिस्ताननं महिन्याभरापूर्वीच आखली होती अशी माहिती लष्करातल्या सूत्रांनी दिलीय. सीमेवर चेक पोस्टवर भारतीय सैनिकांच्या हालचाली, त्यांची संख्या आणि शस्त्रं या सगळ्यांवर पाकिस्तानी सैनिकांनी बारीक लक्ष ठेवलं होतं. भारताच्या सुरक्षेमधल्या काही उणिवा पाकिस्तानी सैनिकांनी शोधून काढल्या. आणि त्यानुसार कट रचून हल्ला केला, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. आता भारतीय लष्कर सीमेवरची गस्त आणि शस्त्रांची संख्या वाढवणार आहे. तर सीमेवरची घटना आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायला भारताचा विरोध आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2013 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close