S M L

बलात्कारविरोधी कायद्यासाठी विशेष अधिवेशन नाहीच !

04 जानेवारीदिल्लीत घडलेल्या बलात्कारनंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने तातडीने उपाययोजना राबवण्यासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा केली होती पण आता यावर सरकारने घुमजाव केलाय. बलात्कारविरोधी कायद्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन होणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात बलात्कारविरोधी कायदा प्रामुख्यानं चर्चेसाठी घेण्यात येणार आहे. सरकारमधल्या सूत्रांनी ही माहिती दिलीय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बलात्कारविरोधी कायदा चर्चेसाठी घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सर्व राज्यांचे पोलीस महासंचालक आणि गृहसचिवांची भेट घेतली. बलात्कार करणार्‍यांना फाशी नको तर जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, असा सर्व राज्यांचा सूर असल्याचं समजतंय. तसंच बालगुन्हेगार ठरवण्याची वयोमर्यादा 18 वरून 16 वर्षं करण्यात यावी, यावर एकमत झाल्याची माहिती आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2013 12:09 PM IST

बलात्कारविरोधी कायद्यासाठी विशेष अधिवेशन नाहीच !

04 जानेवारी

दिल्लीत घडलेल्या बलात्कारनंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने तातडीने उपाययोजना राबवण्यासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा केली होती पण आता यावर सरकारने घुमजाव केलाय. बलात्कारविरोधी कायद्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन होणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात बलात्कारविरोधी कायदा प्रामुख्यानं चर्चेसाठी घेण्यात येणार आहे. सरकारमधल्या सूत्रांनी ही माहिती दिलीय. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बलात्कारविरोधी कायदा चर्चेसाठी घेतला जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सर्व राज्यांचे पोलीस महासंचालक आणि गृहसचिवांची भेट घेतली. बलात्कार करणार्‍यांना फाशी नको तर जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, असा सर्व राज्यांचा सूर असल्याचं समजतंय. तसंच बालगुन्हेगार ठरवण्याची वयोमर्यादा 18 वरून 16 वर्षं करण्यात यावी, यावर एकमत झाल्याची माहिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2013 12:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close