S M L

LOCवर पाक सैनिकांचा गोळीबार, 2 जवान शहीद

08 जानेवारीपाकिस्तानाने युद्धविरामाचे उल्लंघन करत भारतीय सिमारेषेत घुसखोरी करून गोळीबार केला आहे. जम्मू काश्मीरमधल्या पँूछमधल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत. पूँछमधल्या मेंधारमध्ये ही घटना घडलीय. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सिमारेषेत प्रवेश केला. आणि धुक्यांचा फायदा घेत पुढे येत राहिले. यावेळी भारतीय सिमेवर लान्स नाईक हेमराज आणि लान्स नाईक सुधाकर सिंग हे दोन्ही जवान गस्तीवर होते. भारतीय जवानांनी त्यांना माघारी धाडण्यासाठी हल्लाबोल केला. तब्बल अर्धातास फायरिंग सुरू होते. पाक सैनिकांनी पळ काढला पण भारताचे दोन जवान यात शहीद झाले. एका जवानाचं पार्थिव अतिशय वाईट स्थित सापडल्याची माहिती लष्करानं दिलीय. गोळीबार करून पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पण भारतीय सैन्याकडूनच आधी आगळीक झाल्याचा कांगावा पाकिस्ताननं केलाय. मात्र भारतानं हा दावा फेटाळून लावत घटनेचा निषेध केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 8, 2013 05:14 PM IST

LOCवर पाक सैनिकांचा गोळीबार, 2 जवान शहीद

08 जानेवारी

पाकिस्तानाने युद्धविरामाचे उल्लंघन करत भारतीय सिमारेषेत घुसखोरी करून गोळीबार केला आहे. जम्मू काश्मीरमधल्या पँूछमधल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत. पूँछमधल्या मेंधारमध्ये ही घटना घडलीय. पाकिस्तानी सैन्याने भारतीय सिमारेषेत प्रवेश केला. आणि धुक्यांचा फायदा घेत पुढे येत राहिले. यावेळी भारतीय सिमेवर लान्स नाईक हेमराज आणि लान्स नाईक सुधाकर सिंग हे दोन्ही जवान गस्तीवर होते. भारतीय जवानांनी त्यांना माघारी धाडण्यासाठी हल्लाबोल केला. तब्बल अर्धातास फायरिंग सुरू होते. पाक सैनिकांनी पळ काढला पण भारताचे दोन जवान यात शहीद झाले. एका जवानाचं पार्थिव अतिशय वाईट स्थित सापडल्याची माहिती लष्करानं दिलीय. गोळीबार करून पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पण भारतीय सैन्याकडूनच आधी आगळीक झाल्याचा कांगावा पाकिस्ताननं केलाय. मात्र भारतानं हा दावा फेटाळून लावत घटनेचा निषेध केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 8, 2013 05:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close