S M L

पुणे महापालिकेचं बजेट:पुणेकरांच्या डोक्यावर कराचा बोजा

15 जानेवारीपुणे महापालिकेचं 2013-14 साठीचं अंदाजपत्रक आज महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी स्थायी समिती समोर सादर केलं. 3 हजार 605 कोटींचं हे बजेट पुणेकरांच्या डोक्यावरचा कराचा बोजा वाढवणारं ठरलंय. आयुक्तांनी सादर केलेल्या या बजेट मध्ये मिळकत करामध्ये आणि पाणीपट्टी मध्ये वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. या बजेटमध्ये मिळकत करामध्ये तब्बल 8 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे तर पाणीपट्टीमध्ये 100 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.पुण्याचं बजेट- रु. 3,605 कोटींचं बजेट महापालिका आयुक्तांनी केलं सादर - मेट्रो रेल्वेसाठी रु. 15.5 कोटींची तरतूद- मिळकत करामध्ये तब्बल 8 टक्क्यांची वाढ प्रस्तावित- पाणीपट्टीमध्ये 100 रुपयांची वाढ प्रस्तावित- रस्ते बांधणीसाठी 'पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप'वर (पीपीपी) भर देणार- मोनोरेलसाठी प्रकल्प अहवाल तयार करून घेतला जाणार - युवतींना संरक्षणासाठी खास प्रशिक्षण देणार - पाळणाघरं सुरू करणार- पाणीपुरवठा आणि वाहतूक नियोजनावर सगळ्यांत जास्त खर्चमेट्रो धावण्यासाठी 2018 उजाडणारपुणे महापालिकेच्या बजेटमध्ये मेट्रो साठी साडेपंधरा कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्पाला विलंब झाल्याने आता नव्यानं त्याची डेडलाईन ठरवण्यात आली असून मंजुरीनंतर चार वर्ष ही डेडलाईन असणार आहे. यामुळे आता मेट्रो धावण्यासाठी 2018 पर्यंत वाट पहावी लागेल. काही दिवसांपुर्वीच दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी मेट्रोला ग्रीन सिग्नल दिला होता. दरम्यान, पिंपरी चिंचवड ते कात्रज अशा मार्गाला महापालिकेनी मंजुरी दिली असली तरी या मार्गावर प्रकल्प पुन्हा आखायला वेळ लागणार आहे. यामुळे सध्यातरी या मार्गाला कात्री लागलेली असुन आता मेट्रो फक्त स्वारगेट पर्यंतच धावणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2013 05:45 PM IST

पुणे महापालिकेचं बजेट:पुणेकरांच्या डोक्यावर कराचा बोजा

15 जानेवारी

पुणे महापालिकेचं 2013-14 साठीचं अंदाजपत्रक आज महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनी स्थायी समिती समोर सादर केलं. 3 हजार 605 कोटींचं हे बजेट पुणेकरांच्या डोक्यावरचा कराचा बोजा वाढवणारं ठरलंय. आयुक्तांनी सादर केलेल्या या बजेट मध्ये मिळकत करामध्ये आणि पाणीपट्टी मध्ये वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. या बजेटमध्ये मिळकत करामध्ये तब्बल 8 टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे तर पाणीपट्टीमध्ये 100 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे.

पुण्याचं बजेट

- रु. 3,605 कोटींचं बजेट महापालिका आयुक्तांनी केलं सादर - मेट्रो रेल्वेसाठी रु. 15.5 कोटींची तरतूद- मिळकत करामध्ये तब्बल 8 टक्क्यांची वाढ प्रस्तावित- पाणीपट्टीमध्ये 100 रुपयांची वाढ प्रस्तावित- रस्ते बांधणीसाठी 'पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप'वर (पीपीपी) भर देणार- मोनोरेलसाठी प्रकल्प अहवाल तयार करून घेतला जाणार - युवतींना संरक्षणासाठी खास प्रशिक्षण देणार - पाळणाघरं सुरू करणार- पाणीपुरवठा आणि वाहतूक नियोजनावर सगळ्यांत जास्त खर्चमेट्रो धावण्यासाठी 2018 उजाडणार

पुणे महापालिकेच्या बजेटमध्ये मेट्रो साठी साडेपंधरा कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मेट्रो प्रकल्पाला विलंब झाल्याने आता नव्यानं त्याची डेडलाईन ठरवण्यात आली असून मंजुरीनंतर चार वर्ष ही डेडलाईन असणार आहे. यामुळे आता मेट्रो धावण्यासाठी 2018 पर्यंत वाट पहावी लागेल. काही दिवसांपुर्वीच दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी मेट्रोला ग्रीन सिग्नल दिला होता. दरम्यान, पिंपरी चिंचवड ते कात्रज अशा मार्गाला महापालिकेनी मंजुरी दिली असली तरी या मार्गावर प्रकल्प पुन्हा आखायला वेळ लागणार आहे. यामुळे सध्यातरी या मार्गाला कात्री लागलेली असुन आता मेट्रो फक्त स्वारगेट पर्यंतच धावणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2013 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close