S M L

चिपळूण संमेलनावर प्रज्ञा पवारांचा बहिष्कार

07 जानेवारीचिपळूण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायला साहित्यिकांनी विरोध केलाय. नियोजित संमेलनासाठी निमंत्रितांच्या काव्य संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारणार नाही आणि संमेलनालाही जाणार नाही असा निर्णय प्रज्ञा दया पवार यांनी घेतलाय. तसंच निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाच्या चित्रालाही त्यांनी विरोध केलाय. तत्पूर्वी पुष्पा भावेंनी बाळासाहेबांच्या नावाला विरोध केल्यानंतर, शिवसेनेनं त्याच्याविरुद्ध मोर्चाच उघडलाय. पुष्पा भावेंना चिपळूणमध्ये येऊ देणार नाही असा इशाराच शिवसेनेनं दिलाय. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुष्पा भावे साहित्यिकच नाहीत त्या प्रसिद्धीसाठी टीका करत असल्याचा आरोप केलाय. यावर आता साहित्य वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2013 10:50 AM IST

चिपळूण संमेलनावर प्रज्ञा पवारांचा बहिष्कार

07 जानेवारी

चिपळूण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायला साहित्यिकांनी विरोध केलाय. नियोजित संमेलनासाठी निमंत्रितांच्या काव्य संमेलनाचं अध्यक्षपद स्वीकारणार नाही आणि संमेलनालाही जाणार नाही असा निर्णय प्रज्ञा दया पवार यांनी घेतलाय. तसंच निमंत्रण पत्रिकेवर परशुरामाच्या चित्रालाही त्यांनी विरोध केलाय. तत्पूर्वी पुष्पा भावेंनी बाळासाहेबांच्या नावाला विरोध केल्यानंतर, शिवसेनेनं त्याच्याविरुद्ध मोर्चाच उघडलाय. पुष्पा भावेंना चिपळूणमध्ये येऊ देणार नाही असा इशाराच शिवसेनेनं दिलाय. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुष्पा भावे साहित्यिकच नाहीत त्या प्रसिद्धीसाठी टीका करत असल्याचा आरोप केलाय. यावर आता साहित्य वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2013 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close