S M L

रेल्वेचा प्रवास महागला

09 जानेवारीकेंद्र सरकारने नवं वर्षाची सुरूवात महागाईचं 'नारळ' फोडून केलीय. रेल्वेच्या प्रवासात 20 टक्क्याने भाडेवाढ करण्यात आलीय. गेल्या 10 वर्षांतील ही पहिली दरवाढ आहे. या दरवाढीनुसार एसी फर्स्ट क्लास 30 पैसे, स्लीपर क्लास 6 पैसे, मेल एक्स्प्रेस 4 पैशाने आणि मुंबईतील लोकलच्या प्रवासात सेकंड क्लाससाठी 2 पैसे प्रति किलोमीटर, तर फर्स्टक्लासाठी 10 पैसे प्रति किलोमीटर अशी ही वाढ असणार आहे. ही दरवाढ 21 जानेवारीपासून लागू होणार आहे. याबाबत रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. या दरवाढीतून 12000 कोटी जमा करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलंय. येणार्‍या आर्थिक बजेटमध्ये दरवाढ करण्यात येणार नसल्याचंही बन्सल यांनी स्पष्ट केलंय.तब्बल दहा वर्षांनंतर अखेर रेल्वे मंत्रालयाने घसघशीत दरवाढ केलीय. आज रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी पत्रकार परिषद घेऊन नव्या दरवाढीची घोषणा केली. नव्या दरवाढीत एसीचा प्रवास महागला आहे तर सर्वसामानाच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. नव्या दरवाढीत एसी फर्स्ट क्लास 30 पैशांनी महागला आहे. त्यानुसार 300 कि.मीचा प्रवास 90 रुपयांनी महागला आहे. तर स्लीपर क्लास 6 पैशांनी, एसी थ्री टायर क्लास 10 पैसे, एसी टू टायर 15 पैसे, एसी चेअर क्लास कार क्लास 10 पैशांनी महागला आहे. त्यामुळे रेल्वेचा गारेगार प्रवास नव्या दरवाढीमुळे 'गरम' झालाय. तर सर्वसामान्यांचा 'गरीब रथ' आता महाग झालाय. सेकंड क्लास मेल एक्स्प्रेसमध्ये 4 पैसांनी वाढ करण्यात आली. तर मुंबईची 'लाईफ लाईन' लोकलचा प्रवास 2 पैशांनी महागला आहे. या नव्या दरवाढीमुळे रेल्वे मंत्रालयाला गेल्या दहा वर्षात आलेला तोटा भरून काढता येणार असल्याचं बन्सल यांनी सांगितलं. या दरवाढीतून केंद्राच्या तिजोरीत 12,000 कोटी जमा होईल असा विश्वास बन्सल यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर नव्या दरवाढीसोबत चांगल्या सुविधाही देण्यात येईल. रेल्वेच्या सुरक्षेसंदर्भात कुठलीही तडजोड करणार नाही असंही पवनकुमार बन्सल यांनी सांगितलं आहे. रेल्वेच्या सुरक्षा आणि आधुनिकीकरणासाठी हा निधी वापरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वे मंत्री पवन बन्सल यांची घोषणा - रेल्वेप्रवासात 20 टक्के भाडे वाढ- मागिल 10 वर्षांतील पहिली भाडेवाढ- स्लीपर 6 पैसे प्रतिकिलोमीटर वाढ- 12000 कोटी जमा करण्याचं उद्दिष्ट- एसी थ्री टायर 10 पैसे प्रति कि.मी वाढ - एसी फर्स्ट क्लास 30 पैसे प्रति कि.मी वाढ- उपनगरीय रेल्वे 2 पैसे प्रति कि.मी वाढ- सेकंड क्लास मेल एक्स्प्रेस रेल्वेमध्ये 4 पैसे प्रति किमी.- एसी चेअर कार क्लासमध्ये 10 पैसे प्रति कि.मी. - एसी टू टायर 15 पैसे प्रति कि.मी.- एसी सेकंड क्लास 15 पैसे प्रति कि.मी वाढ

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2013 10:00 AM IST

रेल्वेचा प्रवास महागला

09 जानेवारी

केंद्र सरकारने नवं वर्षाची सुरूवात महागाईचं 'नारळ' फोडून केलीय. रेल्वेच्या प्रवासात 20 टक्क्याने भाडेवाढ करण्यात आलीय. गेल्या 10 वर्षांतील ही पहिली दरवाढ आहे. या दरवाढीनुसार एसी फर्स्ट क्लास 30 पैसे, स्लीपर क्लास 6 पैसे, मेल एक्स्प्रेस 4 पैशाने आणि मुंबईतील लोकलच्या प्रवासात सेकंड क्लाससाठी 2 पैसे प्रति किलोमीटर, तर फर्स्टक्लासाठी 10 पैसे प्रति किलोमीटर अशी ही वाढ असणार आहे. ही दरवाढ 21 जानेवारीपासून लागू होणार आहे. याबाबत रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. या दरवाढीतून 12000 कोटी जमा करण्याचं उद्दिष्ट सरकारने ठेवलंय. येणार्‍या आर्थिक बजेटमध्ये दरवाढ करण्यात येणार नसल्याचंही बन्सल यांनी स्पष्ट केलंय.

तब्बल दहा वर्षांनंतर अखेर रेल्वे मंत्रालयाने घसघशीत दरवाढ केलीय. आज रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी पत्रकार परिषद घेऊन नव्या दरवाढीची घोषणा केली. नव्या दरवाढीत एसीचा प्रवास महागला आहे तर सर्वसामानाच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे. नव्या दरवाढीत एसी फर्स्ट क्लास 30 पैशांनी महागला आहे. त्यानुसार 300 कि.मीचा प्रवास 90 रुपयांनी महागला आहे. तर स्लीपर क्लास 6 पैशांनी, एसी थ्री टायर क्लास 10 पैसे, एसी टू टायर 15 पैसे, एसी चेअर क्लास कार क्लास 10 पैशांनी महागला आहे. त्यामुळे रेल्वेचा गारेगार प्रवास नव्या दरवाढीमुळे 'गरम' झालाय. तर सर्वसामान्यांचा 'गरीब रथ' आता महाग झालाय. सेकंड क्लास मेल एक्स्प्रेसमध्ये 4 पैसांनी वाढ करण्यात आली. तर मुंबईची 'लाईफ लाईन' लोकलचा प्रवास 2 पैशांनी महागला आहे. या नव्या दरवाढीमुळे रेल्वे मंत्रालयाला गेल्या दहा वर्षात आलेला तोटा भरून काढता येणार असल्याचं बन्सल यांनी सांगितलं. या दरवाढीतून केंद्राच्या तिजोरीत 12,000 कोटी जमा होईल असा विश्वास बन्सल यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर नव्या दरवाढीसोबत चांगल्या सुविधाही देण्यात येईल. रेल्वेच्या सुरक्षेसंदर्भात कुठलीही तडजोड करणार नाही असंही पवनकुमार बन्सल यांनी सांगितलं आहे. रेल्वेच्या सुरक्षा आणि आधुनिकीकरणासाठी हा निधी वापरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वे मंत्री पवन बन्सल यांची घोषणा - रेल्वेप्रवासात 20 टक्के भाडे वाढ- मागिल 10 वर्षांतील पहिली भाडेवाढ- स्लीपर 6 पैसे प्रतिकिलोमीटर वाढ- 12000 कोटी जमा करण्याचं उद्दिष्ट- एसी थ्री टायर 10 पैसे प्रति कि.मी वाढ - एसी फर्स्ट क्लास 30 पैसे प्रति कि.मी वाढ- उपनगरीय रेल्वे 2 पैसे प्रति कि.मी वाढ- सेकंड क्लास मेल एक्स्प्रेस रेल्वेमध्ये 4 पैसे प्रति किमी.- एसी चेअर कार क्लासमध्ये 10 पैसे प्रति कि.मी. - एसी टू टायर 15 पैसे प्रति कि.मी.- एसी सेकंड क्लास 15 पैसे प्रति कि.मी वाढ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2013 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close