S M L

कोत्तापल्ले यांनी संमेलनावर बहिष्कार टाकावा -लक्ष्मण माने

09 जानेवारीचिपळूण इथं होणार्‍या 86 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील वाद आता आणखी तीव्र झाला आहे. निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाच्या चित्राला अनेकांनी आक्षेप घेतलाय. आता लेखक लक्ष्मण माने यांनी तर संमेलन उधळून लावण्याची धमकी दिलीये. निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाचं चित्र जातीयता दर्शवणारं आहे, तसंच ते पुरुषप्रधान संस्कृतीचं प्रतीक आहे ते वेळीच हटवण्यात यावं अन्यथा संमेलन उधळून लावू असा इशारा लक्ष्मण माने यांनी दिलाय. तसंच संमेलनासाठी आमदारांनी दिलेला निधी दुष्काळग्रस्त भागासाठी दिला जावा अशी मागणीही त्यांनी केली. अशा संमेलनावर नागनाथ कोत्तापल्ले यांनी बहिष्कार टाकावा नाहीतर आम्ही त्यांचं भाषण उधळून लावू असा इशाराही माने यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2013 10:23 AM IST

कोत्तापल्ले यांनी संमेलनावर बहिष्कार टाकावा -लक्ष्मण माने

09 जानेवारी

चिपळूण इथं होणार्‍या 86 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील वाद आता आणखी तीव्र झाला आहे. निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाच्या चित्राला अनेकांनी आक्षेप घेतलाय. आता लेखक लक्ष्मण माने यांनी तर संमेलन उधळून लावण्याची धमकी दिलीये. निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाचं चित्र जातीयता दर्शवणारं आहे, तसंच ते पुरुषप्रधान संस्कृतीचं प्रतीक आहे ते वेळीच हटवण्यात यावं अन्यथा संमेलन उधळून लावू असा इशारा लक्ष्मण माने यांनी दिलाय. तसंच संमेलनासाठी आमदारांनी दिलेला निधी दुष्काळग्रस्त भागासाठी दिला जावा अशी मागणीही त्यांनी केली. अशा संमेलनावर नागनाथ कोत्तापल्ले यांनी बहिष्कार टाकावा नाहीतर आम्ही त्यांचं भाषण उधळून लावू असा इशाराही माने यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2013 10:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close