S M L

हिंदुस्थान मिलच्या जागेला 7.6 एफएसआयचा निर्णय रद्द

07 जानेवारीप्रभादेवी येथील सिध्दीविनायक मंदिराला लागून असलेल्या हिंदुस्थान मिलच्या जागेला 7.6 इतका एफएसआय देण्याचा निर्णय रद्द करण्यात आलाय. 2007 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा निर्णय घेतला होता. तो व्यवहार्य नाही असं नोंदवून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा निर्णय गेल्या महिन्यात रद्द केला. यामुळं आकृती बिल्डरनं विकत घेतलेल्या 6 एकर जागेच्या बांधकामाला फटका बसलाय. 2007 मध्ये आकृती बिल्डरच्या हब टाऊन कंपनीने डीएलफच्या मदतीने 350 कोटीला ही हिंदुस्थान मिलची जागा विकत घेतली होती. त्यावर 7.6 एफएसआय वापरून 60 मजली पंचतारांकित हॉटेल बांधायची योजना होती. पण आता विकासकाला 1.33 इतकाच एफएसआय वापरता येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2013 01:02 PM IST

हिंदुस्थान मिलच्या जागेला 7.6 एफएसआयचा निर्णय रद्द

07 जानेवारी

प्रभादेवी येथील सिध्दीविनायक मंदिराला लागून असलेल्या हिंदुस्थान मिलच्या जागेला 7.6 इतका एफएसआय देण्याचा निर्णय रद्द करण्यात आलाय. 2007 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा निर्णय घेतला होता. तो व्यवहार्य नाही असं नोंदवून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा निर्णय गेल्या महिन्यात रद्द केला. यामुळं आकृती बिल्डरनं विकत घेतलेल्या 6 एकर जागेच्या बांधकामाला फटका बसलाय. 2007 मध्ये आकृती बिल्डरच्या हब टाऊन कंपनीने डीएलफच्या मदतीने 350 कोटीला ही हिंदुस्थान मिलची जागा विकत घेतली होती. त्यावर 7.6 एफएसआय वापरून 60 मजली पंचतारांकित हॉटेल बांधायची योजना होती. पण आता विकासकाला 1.33 इतकाच एफएसआय वापरता येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2013 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close