S M L

मुंबईकर, 'गेट सेट गो...'

19 जानेवारीयंदाचा रविवार मुंबईकरांसाठी खास असणार आहे. आणि याचं कारण आहे मुंबई मॅरेथॉन..मुंबई मॅरेथॉनचं यंदाचं हे दहावं वर्ष आहे आणि यंदा मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांची रेकॉर्ड ब्रेक नोंदणी झाली आहे. दहाव्या मुंबई मॅरेथॉनची तयारी जवळपास पूर्ण झालीय. उद्या मुंबई मॅरेथॉन होतेय.मुंबईकरांच्या एकजुटीचं दर्शन या मॅरेथॉनमध्ये पाहिला मिळतं आणि यंदाही या मॅरेथॉनमध्ये आतापर्येंत रेकॉर्डब्रेक 38 हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय. मुंबई मॅरेथॉनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे आयोजकांचा उत्साहही वाढलाय. दरवर्षी ही स्पर्धा मोठी आणि भव्य व्हावी यासाठी आयोजक प्रयत्न करतात. नेहमीच्या उत्साहात मुंबईकर ही मॅरेथॉन यशस्वी करतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय. जगभरातले जवळपास सर्व प्रमुख धावपटू मॅरेथॉनसाठी मुंबईत दाखल झालेत. आशियातली ही सगळ्यात श्रीमंत मॅरेथॉन यंदा आणखी भव्य आणि मोठ्या स्वरुपात होणार आहे. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यात आलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2013 03:18 PM IST

मुंबईकर, 'गेट सेट गो...'

19 जानेवारी

यंदाचा रविवार मुंबईकरांसाठी खास असणार आहे. आणि याचं कारण आहे मुंबई मॅरेथॉन..मुंबई मॅरेथॉनचं यंदाचं हे दहावं वर्ष आहे आणि यंदा मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांची रेकॉर्ड ब्रेक नोंदणी झाली आहे.

दहाव्या मुंबई मॅरेथॉनची तयारी जवळपास पूर्ण झालीय. उद्या मुंबई मॅरेथॉन होतेय.मुंबईकरांच्या एकजुटीचं दर्शन या मॅरेथॉनमध्ये पाहिला मिळतं आणि यंदाही या मॅरेथॉनमध्ये आतापर्येंत रेकॉर्डब्रेक 38 हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय.

मुंबई मॅरेथॉनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेय. त्यामुळे आयोजकांचा उत्साहही वाढलाय. दरवर्षी ही स्पर्धा मोठी आणि भव्य व्हावी यासाठी आयोजक प्रयत्न करतात. नेहमीच्या उत्साहात मुंबईकर ही मॅरेथॉन यशस्वी करतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय. जगभरातले जवळपास सर्व प्रमुख धावपटू मॅरेथॉनसाठी मुंबईत दाखल झालेत. आशियातली ही सगळ्यात श्रीमंत मॅरेथॉन यंदा आणखी भव्य आणि मोठ्या स्वरुपात होणार आहे. गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी बक्षिसाच्या रकमेत वाढ करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2013 03:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close