S M L

बाळासाहेबांच्या नावाला शरद पवारांचा पाठिंबा

07 जानेवारीचिपळूण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा दिलाय. बाळासासाहेबांचं नाव देण्यात काहीच गैर नाही बाळासाहेबांचं त्यांचे वडिल प्रबोधनकार ठाकरे यांचं साहित्यक्षेत्रात काही देणं आहे त्यामुळे त्यांच्या नावाला कुणाचा विरोध असू नये असं पवार यांनी म्हटलंय. व्यासपीठाला बाळासासाहेबांचं नाव द्यायला काही साहित्यिकांनी विरोध केला होता. तसंच साहित्यिक हमीद दलवाईंच्या घरापासून दिंडी काढायलाही हरकत नाही असं मतही पवारांनी व्यक्त केलंय. साहित्य संमेलनात वाद होत असतात आणि त्यामुळे आपण तिकडे जात नाही. मात्र स्थानिक नेत्यांच्या आग्रहामुळे आपण संमेलनाला जाणार आहोत असंही पवारांनी स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2013 01:18 PM IST

बाळासाहेबांच्या नावाला शरद पवारांचा पाठिंबा

07 जानेवारी

चिपळूण साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाला शिवसेनाप्रमुख बाळासासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा दिलाय. बाळासासाहेबांचं नाव देण्यात काहीच गैर नाही बाळासाहेबांचं त्यांचे वडिल प्रबोधनकार ठाकरे यांचं साहित्यक्षेत्रात काही देणं आहे त्यामुळे त्यांच्या नावाला कुणाचा विरोध असू नये असं पवार यांनी म्हटलंय. व्यासपीठाला बाळासासाहेबांचं नाव द्यायला काही साहित्यिकांनी विरोध केला होता. तसंच साहित्यिक हमीद दलवाईंच्या घरापासून दिंडी काढायलाही हरकत नाही असं मतही पवारांनी व्यक्त केलंय. साहित्य संमेलनात वाद होत असतात आणि त्यामुळे आपण तिकडे जात नाही. मात्र स्थानिक नेत्यांच्या आग्रहामुळे आपण संमेलनाला जाणार आहोत असंही पवारांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2013 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close