S M L

भारतातील पाकिस्तानच्या दुतावासाला सुनावले

09 जानेवारीजम्मू काश्मीरमधल्या पँूछमधल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा आजही गोळीबार सुरू आहे. मंगळवारी पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबार केला. तसंच दोनपैकी एका जवानाच्या पार्थिवाशी छेडछाड केल्यानं परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तांना बोलावून घेतलंय, त्यांच्याकडे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. तसंच पाकिस्ताननं या घटनेची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. हा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन आहे, यापुढे पाकिस्ताननं पुन्हा असे हल्ले करू नये असंही पाकिस्तानला सुनावलंय. तर पाकिस्तानची ही कृती चिथावणीखोर असल्याचं संरक्षणमंत्री ए.के.अँटोनी यांनी म्हटलंय. दरम्यान पाकिस्ताननं गोळीबार केला नसल्याचा दावा केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2013 11:18 AM IST

भारतातील पाकिस्तानच्या दुतावासाला सुनावले

09 जानेवारी

जम्मू काश्मीरमधल्या पँूछमधल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा आजही गोळीबार सुरू आहे. मंगळवारी पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबार केला. तसंच दोनपैकी एका जवानाच्या पार्थिवाशी छेडछाड केल्यानं परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तानच्या भारतातील उच्चायुक्तांना बोलावून घेतलंय, त्यांच्याकडे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. तसंच पाकिस्ताननं या घटनेची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी. हा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन आहे, यापुढे पाकिस्ताननं पुन्हा असे हल्ले करू नये असंही पाकिस्तानला सुनावलंय. तर पाकिस्तानची ही कृती चिथावणीखोर असल्याचं संरक्षणमंत्री ए.के.अँटोनी यांनी म्हटलंय. दरम्यान पाकिस्ताननं गोळीबार केला नसल्याचा दावा केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2013 11:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close