S M L

टंचाईसदृश गावांचा 100 टक्के शेतसारा माफ

11 जानेवारीमराठवाडा आणि विदर्भातल्या अनेत भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहेत. औरंगाबाद, पुणे, नाशिक आणि कोकण विभागातील टंचाईसदृश 7 हजार 64 गावांतील शेतकर्‍यांचा 100 टक्के शेतसारा माफ करण्यात आलाय. या गावांची पैसेवारी 50 पेक्षाकमी आढळली आहे. इथं वीजबिलातही 33 टक्के सूट देण्यात आली. कृषी कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली. औरंगाबाद विभागात सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती आहे. नागपूर आणि अमरावती विभागातील पैसेवारी 15 जानेवारीला घोषित केली जाणार आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्र सरकारनंही मदत जाहीर केलीये. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली केंद्राच्या आपत्ती निवारण समितीची बैठक झाली. त्यात महाराष्ट्राला 778 कोटींची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2013 10:16 AM IST

टंचाईसदृश गावांचा 100 टक्के शेतसारा माफ

11 जानेवारी

मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेत भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहेत. औरंगाबाद, पुणे, नाशिक आणि कोकण विभागातील टंचाईसदृश 7 हजार 64 गावांतील शेतकर्‍यांचा 100 टक्के शेतसारा माफ करण्यात आलाय. या गावांची पैसेवारी 50 पेक्षाकमी आढळली आहे. इथं वीजबिलातही 33 टक्के सूट देण्यात आली. कृषी कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात आली. औरंगाबाद विभागात सर्वाधिक दुष्काळी परिस्थिती आहे. नागपूर आणि अमरावती विभागातील पैसेवारी 15 जानेवारीला घोषित केली जाणार आहे. दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला केंद्र सरकारनंही मदत जाहीर केलीये. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली केंद्राच्या आपत्ती निवारण समितीची बैठक झाली. त्यात महाराष्ट्राला 778 कोटींची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2013 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close