S M L

प्राध्यापकांनी पुन्हा उपसले बहिष्काराचे हत्यार

14 जानेवारीविद्यापीठातील प्राध्यापकांनी पुन्हा एकदा बहिष्काराचे हत्यार उपसले आहे. पुढील महिन्यात 4 फेब्रुवारीपासून राज्यातील 10 विद्यापीठातील 60 हजार प्राध्यापकांनी परीक्षेच्या सर्व कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पेपर सेटिंग, सुपरव्हिजन आणि पेपर तपासण्यावर प्राध्यापक बहिष्कार घालणार आहेत. राज्य सरकारनं प्राध्यापकांना दिलेलं आश्वासनं न पाळल्याचा आरोप एम फुक्टोनं केला आहे. 16 जानेवारीला एमफुक्टो सरकारला यासंबंधीची नोटीस देणार असल्याचंही कळतंय. पण सरकार आणि प्राध्यापकांच्या भांडणाचा फटका हा आता विद्यार्थ्यांना बसणार आहे. मागील वर्षी मे महिन्यात राज्यातील 30 हजार प्राध्यपाकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. तब्बल दीडमहिनाभर चाललेल्या या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे पेपर तपासणीचा निकाल उशिरा लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते आणि आता पुन्हा एकदा प्राध्यापकांनी बहिष्काराचे हत्यार उपसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. प्राध्यापकांच्या मागण्या - एप्रिल 2009 ते जानेवारी 2010 काळातील सहाव्या वेतन आयोगाची रोख रक्कम थकबाकी राज्यसरकारकडून त्वरित मिळावी- जानेवारी 2006 ते मार्च 2009 मधील सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ता केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळावेत- 1991 ते 2000 याकाळात नेट-सेट ची परीक्षा न दिलेल्या प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली होती या प्राध्यापकांना सेवेत कायम करावे

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2013 11:53 AM IST

प्राध्यापकांनी पुन्हा उपसले बहिष्काराचे हत्यार

14 जानेवारी

विद्यापीठातील प्राध्यापकांनी पुन्हा एकदा बहिष्काराचे हत्यार उपसले आहे. पुढील महिन्यात 4 फेब्रुवारीपासून राज्यातील 10 विद्यापीठातील 60 हजार प्राध्यापकांनी परीक्षेच्या सर्व कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. पेपर सेटिंग, सुपरव्हिजन आणि पेपर तपासण्यावर प्राध्यापक बहिष्कार घालणार आहेत. राज्य सरकारनं प्राध्यापकांना दिलेलं आश्वासनं न पाळल्याचा आरोप एम फुक्टोनं केला आहे. 16 जानेवारीला एमफुक्टो सरकारला यासंबंधीची नोटीस देणार असल्याचंही कळतंय. पण सरकार आणि प्राध्यापकांच्या भांडणाचा फटका हा आता विद्यार्थ्यांना बसणार आहे. मागील वर्षी मे महिन्यात राज्यातील 30 हजार प्राध्यपाकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. तब्बल दीडमहिनाभर चाललेल्या या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे पेपर तपासणीचा निकाल उशिरा लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते आणि आता पुन्हा एकदा प्राध्यापकांनी बहिष्काराचे हत्यार उपसल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होण्याची शक्यता आहे.

प्राध्यापकांच्या मागण्या

- एप्रिल 2009 ते जानेवारी 2010 काळातील सहाव्या वेतन आयोगाची रोख रक्कम थकबाकी राज्यसरकारकडून त्वरित मिळावी- जानेवारी 2006 ते मार्च 2009 मधील सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे हप्ता केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळावेत- 1991 ते 2000 याकाळात नेट-सेट ची परीक्षा न दिलेल्या प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली होती या प्राध्यापकांना सेवेत कायम करावे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2013 11:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close