S M L

संतोष माने म्हणतो, 'तो मी नव्हेच'

25 जानेवारीपुण्यामध्ये संतोष माने या एसटी ड्रायव्हरनं बस पळवून ती बेफामपणे चालवत 8 निरपराध लोकांचा बळी घेतला होता. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होतंय. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात जबाब नोंदवण्यास सुरूवात झाली आहे. पण संतोष मानेनं आपण बस चालवतच नव्हतो आणि आपण अपघात केलाच नाही असा दावा केलाय. न्यायाधीशांनी संतोष मानेला जवळपास 66 प्रश्न विचारले बहुतेक प्रश्नांची उत्तर देण्यास टाळाटाळ केली किंवा माहित नाही आठवत नाही अशी उत्तरं दिली. 25 जानेवारी 12 रोजी माथेफिरू संतोष माने या ड्रायव्हरनं रागाच्या भरात एक रिकामी बस..स्टँडच्या बाहेर काढली. आणि भरधाव वेगाने कँपच्या दिशने तो निघाला. सकाळची वेळ असल्यामुळे अनेक मुलं शाळा कॉलेजात जाण्याच्या लगबगीत होती. त्या सगळ्यांना निर्दयीपणे चिरडत संतोष पुढे गेला. कँपमध्ये गर्दी काहीशी कमी असल्याने त्याने वेग वाढवला. इथंही त्यांने वाटेत अनेक दुचाकी वाहनांना तुडवलं. कँपला वळसा घालून तो खडक पोलीस स्टेशनच्या दिशेनं आला होता. एव्हाना अर्धा तास उलटला होता. हा ब्रेक फेल होण्याचा प्रकार नाही, हे उघड झालं होतं. पोलीस संतोषच्या मागे होते. गोळीबार करून त्याची बस थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याचा हैदोस काही थांबत नव्हता. मग संतोषने पुन्हा स्वारगेटकडे मोर्चा वळवला. नीलायम थिएटरजवळ त्याने एकापाठोपाठ एक तीन मोठ्या गाड्यांना टक्कर दिली. त्यामुळे त्याचा वेग मंदावला. तीच संधी साधून शरीफ इब्राहिम कुट्टी या शूर विद्यार्थ्याने त्या बसवर झडप घातली आणि संतोषला पकडलं. संतोषला पकडल्यानंतर संतापलेल्या पुणेकरांचा स्फोट झाला. त्यांनी त्याला चोप देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला ताबडतोब ताब्यात घेतलं. ठीक 60 मिनिटांत या भयनाट्यावर पडदा पडला होता. पण तोवर अनेक जीव काळाच्या पडद्याआड गेले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 25, 2013 10:26 AM IST

संतोष माने म्हणतो, 'तो मी नव्हेच'

25 जानेवारी

पुण्यामध्ये संतोष माने या एसटी ड्रायव्हरनं बस पळवून ती बेफामपणे चालवत 8 निरपराध लोकांचा बळी घेतला होता. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होतंय. या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात जबाब नोंदवण्यास सुरूवात झाली आहे. पण संतोष मानेनं आपण बस चालवतच नव्हतो आणि आपण अपघात केलाच नाही असा दावा केलाय. न्यायाधीशांनी संतोष मानेला जवळपास 66 प्रश्न विचारले बहुतेक प्रश्नांची उत्तर देण्यास टाळाटाळ केली किंवा माहित नाही आठवत नाही अशी उत्तरं दिली.

25 जानेवारी 12 रोजी माथेफिरू संतोष माने या ड्रायव्हरनं रागाच्या भरात एक रिकामी बस..स्टँडच्या बाहेर काढली. आणि भरधाव वेगाने कँपच्या दिशने तो निघाला. सकाळची वेळ असल्यामुळे अनेक मुलं शाळा कॉलेजात जाण्याच्या लगबगीत होती. त्या सगळ्यांना निर्दयीपणे चिरडत संतोष पुढे गेला. कँपमध्ये गर्दी काहीशी कमी असल्याने त्याने वेग वाढवला. इथंही त्यांने वाटेत अनेक दुचाकी वाहनांना तुडवलं. कँपला वळसा घालून तो खडक पोलीस स्टेशनच्या दिशेनं आला होता. एव्हाना अर्धा तास उलटला होता. हा ब्रेक फेल होण्याचा प्रकार नाही, हे उघड झालं होतं. पोलीस संतोषच्या मागे होते. गोळीबार करून त्याची बस थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याचा हैदोस काही थांबत नव्हता. मग संतोषने पुन्हा स्वारगेटकडे मोर्चा वळवला. नीलायम थिएटरजवळ त्याने एकापाठोपाठ एक तीन मोठ्या गाड्यांना टक्कर दिली. त्यामुळे त्याचा वेग मंदावला. तीच संधी साधून शरीफ इब्राहिम कुट्टी या शूर विद्यार्थ्याने त्या बसवर झडप घातली आणि संतोषला पकडलं. संतोषला पकडल्यानंतर संतापलेल्या पुणेकरांचा स्फोट झाला. त्यांनी त्याला चोप देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला ताबडतोब ताब्यात घेतलं. ठीक 60 मिनिटांत या भयनाट्यावर पडदा पडला होता. पण तोवर अनेक जीव काळाच्या पडद्याआड गेले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 25, 2013 10:26 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close