S M L

शेजारी निघाला मारेकरी, दर्शन शहा खून प्रकरणाचा लागला छडा

14 जानेवारीकोल्हापूरमध्ये खंडणीसाठी अपहरण करुन खून करण्यात आलेल्या दर्शन शहा खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. दर्शन शहाचा मारेकरी हा त्यांचाच शेजारी निघालाय. चारू चांदणे असं या तरूणाचे नाव आहे. दर्शनच्या घराशेजारचा चारू चांदणे या कर्जबाजारी तरुणानेच दर्शनचा खून केल्याचं आता उघड झालंय. आरोपी चांदणे याला पोलिसांनी अटक केलीय. मात्र त्याचा दुसरा साथीदार अजून फरार आहे. सुमारे अडीच लाख रूपयांचे कर्ज फेडण्यासाठीच चांदणेनं हे कृत्य केलंय. मागिल महिन्यात 26 डिसेंबरला दर्शन शहा (वय 10) या शाळकरी मुलाचा खून झाला होता. 23 डिसेंबरला त्याचं अपहरण झालं होतं. अपहरणकर्त्यांनी 25 तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची आणि रोख रक्कमेची मागणी केली होती. पण पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यामुळे आरोपींनी दर्शनचा खून करून त्याचा मृतदेह देवकर पाणंद भागातल्या एका विहिरीत फेकून दिला होता. अपहरणकर्त्यांनी शहा यांच्या घरी एक चिठ्ठीही टाकली होती. ही चिठ्ठी हिंदी भाषेत होती त्यामुळे अपहरणकर्ते हे परप्रांतिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. या प्रकरणाच्या संपूर्ण तपासात पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती. आणि आज अखेर 18 दिवसांनंतर पोलिसांच्या तपासाला यश आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2013 12:18 PM IST

शेजारी निघाला मारेकरी, दर्शन शहा खून प्रकरणाचा लागला छडा

14 जानेवारी

कोल्हापूरमध्ये खंडणीसाठी अपहरण करुन खून करण्यात आलेल्या दर्शन शहा खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय. दर्शन शहाचा मारेकरी हा त्यांचाच शेजारी निघालाय. चारू चांदणे असं या तरूणाचे नाव आहे. दर्शनच्या घराशेजारचा चारू चांदणे या कर्जबाजारी तरुणानेच दर्शनचा खून केल्याचं आता उघड झालंय. आरोपी चांदणे याला पोलिसांनी अटक केलीय. मात्र त्याचा दुसरा साथीदार अजून फरार आहे.

सुमारे अडीच लाख रूपयांचे कर्ज फेडण्यासाठीच चांदणेनं हे कृत्य केलंय. मागिल महिन्यात 26 डिसेंबरला दर्शन शहा (वय 10) या शाळकरी मुलाचा खून झाला होता. 23 डिसेंबरला त्याचं अपहरण झालं होतं. अपहरणकर्त्यांनी 25 तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची आणि रोख रक्कमेची मागणी केली होती. पण पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यामुळे आरोपींनी दर्शनचा खून करून त्याचा मृतदेह देवकर पाणंद भागातल्या एका विहिरीत फेकून दिला होता. अपहरणकर्त्यांनी शहा यांच्या घरी एक चिठ्ठीही टाकली होती. ही चिठ्ठी हिंदी भाषेत होती त्यामुळे अपहरणकर्ते हे परप्रांतिय असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. या प्रकरणाच्या संपूर्ण तपासात पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती. आणि आज अखेर 18 दिवसांनंतर पोलिसांच्या तपासाला यश आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2013 12:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close