S M L

मुदगल बंधार्‍याच्या पाण्यावरून शिवसैनिकांची दगडफेक

21 जानेवारीपरभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातून वाहणार्‍या गोदावरी नदीवरील मुदगल बंधार्‍यातील पाणी परळी औष्णिक विद्युत केंद्राला देण्यात आले याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून आज परभणीत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेकरांनी दुपारी शहरातील बी रघुनाथ सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठकही आयोजित केली होती. पण बैठक सुरू असतानाच मोर्चेकरांनी या सभागृहाची तोडफोड करत पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी या आंदोलकावर यावेळी सौम्य लाठीमार केला. पुन्हा शिवसैनिकांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळवला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचाही फोडल्या . त्यामुळे परभणी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मोर्चात आमदार संजय जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2013 10:07 AM IST

मुदगल बंधार्‍याच्या पाण्यावरून शिवसैनिकांची दगडफेक

21 जानेवारी

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातून वाहणार्‍या गोदावरी नदीवरील मुदगल बंधार्‍यातील पाणी परळी औष्णिक विद्युत केंद्राला देण्यात आले याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून आज परभणीत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेकरांनी दुपारी शहरातील बी रघुनाथ सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठकही आयोजित केली होती. पण बैठक सुरू असतानाच मोर्चेकरांनी या सभागृहाची तोडफोड करत पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी या आंदोलकावर यावेळी सौम्य लाठीमार केला. पुन्हा शिवसैनिकांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळवला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या काचाही फोडल्या . त्यामुळे परभणी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मोर्चात आमदार संजय जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी,कार्यकर्तेही सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2013 10:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close