S M L

पाण्याअभावी राज्यावर भारनियमनाचं संकट

19 जानेवारीदुष्काळाच्या झळा असह्य झाले असतांना आता राज्यावर भारनियमनाचं संकट घोंघावत आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील विद्युत निर्मिती बंद पडू शकते. 1150 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेपैकी 450 मेगावॅट वीज निर्मिती बंद पडली आहे. सध्या सुरू असलेल्या तीन युनिटसला खडका बंधार्‍यातून पाणीपुरवठा केला जातो. पण त्यातलंही पाणी संपल्यामुळे वीज निर्मिती बंद झाली आहे. त्याशिवाय मुदगल बंधार्‍यातून पाणी सोडण्यास शेतकर्‍यांचा विरोध असल्यानं यावर्षीच्या दुष्काळामुळे वीजनिर्मिती बंद पडण्याची शक्यता आहे. पाणी देण्याच्या वादावरून शेतकर्‍यांनी बंधार्‍यावरील ऑफिसची तोडफोड केल्याची घटनाही घडली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2013 10:46 AM IST

पाण्याअभावी राज्यावर भारनियमनाचं संकट

19 जानेवारी

दुष्काळाच्या झळा असह्य झाले असतांना आता राज्यावर भारनियमनाचं संकट घोंघावत आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्रातील विद्युत निर्मिती बंद पडू शकते. 1150 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेपैकी 450 मेगावॅट वीज निर्मिती बंद पडली आहे. सध्या सुरू असलेल्या तीन युनिटसला खडका बंधार्‍यातून पाणीपुरवठा केला जातो. पण त्यातलंही पाणी संपल्यामुळे वीज निर्मिती बंद झाली आहे. त्याशिवाय मुदगल बंधार्‍यातून पाणी सोडण्यास शेतकर्‍यांचा विरोध असल्यानं यावर्षीच्या दुष्काळामुळे वीजनिर्मिती बंद पडण्याची शक्यता आहे. पाणी देण्याच्या वादावरून शेतकर्‍यांनी बंधार्‍यावरील ऑफिसची तोडफोड केल्याची घटनाही घडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2013 10:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close