S M L

पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्राकडून हिरवा कंदील

10 जानेवारीपुण्यातला रखडलेला मेट्रो प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत या प्रकल्पाला केंद्र सरकारनं तत्वत: मान्यता दिलीय. प्रकल्पासाठी कंपनी स्थापन करण्याची सुचना केंद्रानं केलीय. पुणे मेट्रोसाठी केंद्र सरकार अनुकूल आहे असं नगरविकासमंत्री कमल नाथ यांनी सांगितलं. प्रकल्पाला केंद्र देणार 20 टक्के तर जपानी बँकेकडून 50 टक्के कर्ज तर 30 टक्के रक्कम पुणे आणि पिंपरी महापालिका उभारणार आहे. दोन्ही महापालिका आणि राज्यसरकार यांनी आता प्रस्ताव तयार करून केंद्राला पाठवायचा आहे. दरम्यान, मेट्रोबरोबरच मोनो रेल्वेही मार्गी लागण्याची शक्यता आहे. आज नगरविकास मंत्री कमलनाथ यांच्यासोबत झालेल्या बैठकीला पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेचे आयुक्त, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुरेश कलमाडी, भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर हे उपस्थित होते.पुणे मेट्रोचा प्रस्ताव पुणे मनपाच्या हद्दीतून एकूण 50 किलोमीटरचा मेट्रो मार्ग प्रस्तावित वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट अशा दोन मार्गांना मनपाची मंजुरी स्वारगेटपर्यंतची मेट्रो पुढे कात्रजपर्यंत नेण्याचा प्रस्तावकेंद्र सरकारची पुणे मेट्रो प्रकल्पाला तत्वत: मान्यताकेंद्र सरकार देणार 20 टक्के निधी जपान बँकेकडून 50 टक्के निधी कर्ज रूपात मिळणार30 टक्के निधीची तरतूद पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा करणार मेट्रोसाठी वेगळ्या कंपनीची स्थापना होणार कंपनी स्थापल्यानंतरच निधी मिळणार

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2013 10:00 AM IST

पुणे मेट्रो प्रकल्पाला केंद्राकडून हिरवा कंदील

10 जानेवारी

पुण्यातला रखडलेला मेट्रो प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत या प्रकल्पाला केंद्र सरकारनं तत्वत: मान्यता दिलीय. प्रकल्पासाठी कंपनी स्थापन करण्याची सुचना केंद्रानं केलीय. पुणे मेट्रोसाठी केंद्र सरकार अनुकूल आहे असं नगरविकासमंत्री कमल नाथ यांनी सांगितलं. प्रकल्पाला केंद्र देणार 20 टक्के तर जपानी बँकेकडून 50 टक्के कर्ज तर 30 टक्के रक्कम पुणे आणि पिंपरी महापालिका उभारणार आहे. दोन्ही महापालिका आणि राज्यसरकार यांनी आता प्रस्ताव तयार करून केंद्राला पाठवायचा आहे. दरम्यान, मेट्रोबरोबरच मोनो रेल्वेही मार्गी लागण्याची शक्यता आहे. आज नगरविकास मंत्री कमलनाथ यांच्यासोबत झालेल्या बैठकीला पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेचे आयुक्त, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुरेश कलमाडी, भाजपचे खासदार प्रकाश जावडेकर हे उपस्थित होते.

पुणे मेट्रोचा प्रस्ताव

पुणे मनपाच्या हद्दीतून एकूण 50 किलोमीटरचा मेट्रो मार्ग प्रस्तावित वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट अशा दोन मार्गांना मनपाची मंजुरी स्वारगेटपर्यंतची मेट्रो पुढे कात्रजपर्यंत नेण्याचा प्रस्तावकेंद्र सरकारची पुणे मेट्रो प्रकल्पाला तत्वत: मान्यताकेंद्र सरकार देणार 20 टक्के निधी जपान बँकेकडून 50 टक्के निधी कर्ज रूपात मिळणार30 टक्के निधीची तरतूद पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा करणार मेट्रोसाठी वेगळ्या कंपनीची स्थापना होणार कंपनी स्थापल्यानंतरच निधी मिळणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2013 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close