S M L

पुण्यात महिलांची महिलांसाठी टॅक्सीसेवा

5 डिसेंबर, पुणेनितीन चौधरीअनेक नाविन्यपूर्ण गोष्टींचा श्रीगणेशा करणार्‍या पुण्यात आता महिलांनी महिलांसाठी चालवलेल्या टॅक्सी सेवेचा शुभारंभ झालाय. यासाठी लेट देम ड्राईव्ह या नावानं स्वतंत्र कंपनीची स्थापनाही झालीय. स्वत: टॅक्स कन्सल्टंट असलेल्या विशाखा गायकवाड यांना कामानिमित्त अनेक ठिकाणी फिरावं लागतं. अनेकदा पुरुष टॅक्सी ड्रायव्हरसोबत प्रवास करावा लागायचा. त्यातूनच महिला टॅक्सी चालकाची गरज भासू लागली. "मग मी स्वत: ड्रायव्हिंग शिकले. बॉनेट कसं उघडायचं, पंक्चर कसं काढायचं, या सगळ्या गोष्टी मी शिकून घेतल्या" असं विशाखा गायकवाड यांनी सांगितलं.याच कल्पनेतून लेट देम ड्राईव्ह या कंपनेची स्थापना झालीये. पाच महिला ड्रायव्हर्सना सोबत घेऊन महिलांसाठी चालवलेली टॅक्सी सर्व्हिस पुण्यात पहिल्यांदाच सुरू झाली आहे. "आम्ही जिथे प्रशिक्षण घेतलंय मिलेनिअम मोबिलीटी कसं सुधारायचं हे आम्हाला छान मिळालेलं आहे. यामुळं आमचं मनोबल वाढलंय" असं टॅक्सीचालक हेमा लेले यांनी सांगितलं. यातल्या तीन महिलांना कराटेचं ट्रेनिंगही मिळालयं. त्यामुळं महिला प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेणं सोपं झालंयं. "आज महिला अनेक क्षेत्रात काम करतात. महिलांना बर्‍याच ठिकाणी बाहेर जावं लागतं रात्री अपरात्री त्या बाहेर जात असतात. त्यामुळं त्यांना महिला चालक आवश्यक आहेत" असं टॅक्सीचालक मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितलं.हा उपक्रम सुरू करताना या क्षेत्रातल्या यशस्वी उद्योजकांचं मार्गदर्शन घेण्यात आलय. त्यामुळे याला उत्तम प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2008 04:44 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 04:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close