S M L

इंग्लंडची भारतावर 9 रन्सनं मात

11 जानेवारीइंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत पराभव पत्कारून सुध्दा वनडे सीरिजच्या पहिल्याच मॅचमध्ये भारताचा पराभव झालाय. राजकोट वन डेत इंग्लंडनं भारतावर 9 रन्सनं मात करत 5 मॅचच्या वन डे सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 326 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. कॅप्टन ऍलिस्टर कुक, इयान बेल यांच्या हाफसेंच्युरी आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये समित पटेलनं केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडनं हा बलाढ्य स्कोर उभा केला. याला उत्तर देताना भारतीय टीमला 9 विकेट गमावत 316 रन्स करता आले. गौतम गंभीर, युवराज सिंग आणि सुरेश रैनानं हाफसेंच्युरी केली, पण ठराविक अंतरानं विकेट गेल्यानं भारताला अखेर 9 रन्सनं पराभव स्विकारावा लागला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2013 02:53 PM IST

इंग्लंडची भारतावर 9 रन्सनं मात

11 जानेवारी

इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेत पराभव पत्कारून सुध्दा वनडे सीरिजच्या पहिल्याच मॅचमध्ये भारताचा पराभव झालाय. राजकोट वन डेत इंग्लंडनं भारतावर 9 रन्सनं मात करत 5 मॅचच्या वन डे सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 326 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. कॅप्टन ऍलिस्टर कुक, इयान बेल यांच्या हाफसेंच्युरी आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये समित पटेलनं केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडनं हा बलाढ्य स्कोर उभा केला. याला उत्तर देताना भारतीय टीमला 9 विकेट गमावत 316 रन्स करता आले. गौतम गंभीर, युवराज सिंग आणि सुरेश रैनानं हाफसेंच्युरी केली, पण ठराविक अंतरानं विकेट गेल्यानं भारताला अखेर 9 रन्सनं पराभव स्विकारावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2013 02:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close