S M L

गडकरींच्या दुसर्‍या टर्मला भाजपमधून विरोध

21 जानेवारीभाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन गडकरी यांच्या दुसर्‍या टर्मबाबत अजूनही वादविवाद सुरू आहेत. भाजपनं आज निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केलीये. पक्षाच्या पदाधिकार्‍यांची आज एक बैठक झाली. या बैठकीत गडकरींच्या नावाचा प्रस्ताव कोण मांडणार यावर चर्चा झाल्याचं समजतंय. दरम्यान आता गडकरींच्या राजीनाम्याची मागणी करणार्‍या राम जेठमलानी यांचे पुत्र महेश जेठमलानी यांनी आता पुन्हा गडकरींना थेट आव्हान दिलंय. गडकरींना पुन्हा अध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यास आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. तर दुसरीकडे संघाचे नेते सुरेश सोनी हे आज अडवाणींची भेट घेणार आहेत. सोनी यांनीही गडकरींच्या दुसर्‍या टर्मला विरोध केलाय. पण आरएसएसनं गडकरींच्याच नावाला पाठिंबा दिल्यानं या स्पर्धेत सध्या तरी गडकरी सगळ्यात पुढे आहेत.तर करचुकवेगिरीप्रकरणी आयकर विभागानं चौकशीसाठी गडकरींना बोलावलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 21, 2013 11:44 AM IST

गडकरींच्या दुसर्‍या टर्मला भाजपमधून विरोध

21 जानेवारी

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन गडकरी यांच्या दुसर्‍या टर्मबाबत अजूनही वादविवाद सुरू आहेत. भाजपनं आज निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केलीये. पक्षाच्या पदाधिकार्‍यांची आज एक बैठक झाली. या बैठकीत गडकरींच्या नावाचा प्रस्ताव कोण मांडणार यावर चर्चा झाल्याचं समजतंय. दरम्यान आता गडकरींच्या राजीनाम्याची मागणी करणार्‍या राम जेठमलानी यांचे पुत्र महेश जेठमलानी यांनी आता पुन्हा गडकरींना थेट आव्हान दिलंय. गडकरींना पुन्हा अध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यास आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. तर दुसरीकडे संघाचे नेते सुरेश सोनी हे आज अडवाणींची भेट घेणार आहेत. सोनी यांनीही गडकरींच्या दुसर्‍या टर्मला विरोध केलाय. पण आरएसएसनं गडकरींच्याच नावाला पाठिंबा दिल्यानं या स्पर्धेत सध्या तरी गडकरी सगळ्यात पुढे आहेत.तर करचुकवेगिरीप्रकरणी आयकर विभागानं चौकशीसाठी गडकरींना बोलावलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 21, 2013 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close