S M L

गडकरींना हटवण्यामागे चार भाजप नेत्यांचे कारस्थान -वैद्य

30 जानेवारीनितीन गडकरी हे दुसर्‍यांदा अध्यक्ष होऊ नये यासाठी भाजपमधील चार नेत्यांनी त्यांच्या विरुद्ध मोहिम राबवली आणि या कारस्थानात सरकारचाही सहभाग असल्याचा संशय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केला आहे. भाजपचे नेते यशवंत सिन्हा, राम जेठमलानी, महेश जेठमलानी आणि शत्रुघ्न सिन्हा हे चार नेते गडकरी पुन्हा अध्यक्ष होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते. पण राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आधीच पूर्ती कंपनीच्या कार्यालयांवर टाकलेल्या धाडीतून या संपुर्ण कारस्थानात सरकारही असल्याची शंका मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केली. जर यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अर्ज भरला असता तर गडकरींना निवडणुकीत 70 टक्के मते पडली असती असंही वैद्य यांनी सांगितलं. परवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी आपल्या घरी घेतलेली भेट ही भक्त खाजगी होती असंही वैद्य यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2013 10:10 AM IST

गडकरींना हटवण्यामागे चार भाजप नेत्यांचे कारस्थान -वैद्य

30 जानेवारी

नितीन गडकरी हे दुसर्‍यांदा अध्यक्ष होऊ नये यासाठी भाजपमधील चार नेत्यांनी त्यांच्या विरुद्ध मोहिम राबवली आणि या कारस्थानात सरकारचाही सहभाग असल्याचा संशय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केला आहे. भाजपचे नेते यशवंत सिन्हा, राम जेठमलानी, महेश जेठमलानी आणि शत्रुघ्न सिन्हा हे चार नेते गडकरी पुन्हा अध्यक्ष होऊ नये यासाठी प्रयत्नशील होते. पण राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आधीच पूर्ती कंपनीच्या कार्यालयांवर टाकलेल्या धाडीतून या संपुर्ण कारस्थानात सरकारही असल्याची शंका मा. गो. वैद्य यांनी व्यक्त केली. जर यशवंत सिन्हा यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अर्ज भरला असता तर गडकरींना निवडणुकीत 70 टक्के मते पडली असती असंही वैद्य यांनी सांगितलं. परवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी आपल्या घरी घेतलेली भेट ही भक्त खाजगी होती असंही वैद्य यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2013 10:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close