S M L

बहादूर मलालाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

04 डिसेंबरपाकिस्तानात तालिबान्यांविरोधात आवाज उठवणार्‍या किशोरवयीन मलाला युसूफझई हिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय. इंग्लंडमधल्या बर्मिंगहममधल्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. डिस्चार्ज मिळाला असला तरी तिच्यावर उपचार सुरूच राहणार आहेत. तिच्यावर पुन्हा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी केली जाणार आहे. ती यापुढे इंग्लंडमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. 9 ऑक्टोबरला मलाला हिला तालिबानी बंडखोरांनी गोळी घालून मारण्याचा प्रयत्न केला. पण यात ती बचावलीय. तिच्यावर झालेल्या हल्ल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जगभरातून निषेध होतोय.मलाला युसूफझई... तालिबान्यांचं वर्चस्व असलेल्या स्वात खोर्‍यातलं महत्त्वाचं शहर असलेल्या मिंगोराची राहणारी..सामान्य दिसणार्‍या या असामान्य मुलीनं वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी तालिबानी अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. तिनं 2009 साली तालिबान्यांच्या अत्याचाराविषयी लिहिलेली डायरी बीबीसीनं प्रसिद्ध केली आणि या चिमुकल्या रणरागिणीची ओळख जगाला झाली. त्यानंतर तिनं स्वत:चा स्वतंत्र ब्लॉग सुरू केला. आज चौदा वर्षांची असलेल्या मलालाला तालिबानी बंडखोरांनी गोळी झाडून मारण्याचा प्रयत्न केला. ती शाळेतून परतत असताना तालिबान्यांनी तिची बस अडवली आणि तिचं नाव घेत बेछूट गोळीबार केला. गोळी मलालाच्या डोक्याला लागून तिच्या खांद्यात गेली. इतर दोन मुलीही जखमी झाल्या. तालिबान्यांनी या हल्ल्याचं समर्थन केलंय. 'मलाला आता बचावली तरी पुढे वाचणार नाही. आम्ही नक्कीच तिला ठार मारू. स्थानिक पश्तून लोकांच्या मूल्यांच्या विरुद्ध ती धर्मनिरपेक्ष आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा पुढाकार करते असा इशारा तालिबानी संघटनेनं दिलाय.मलालाच्या वडिलांची मुलींची शाळा होती. ती आता बंद आहे. पण त्यांनी मलालाला नेहमीच पाठिंबा दिलाय. त्यांच्या कुटुंबाला गेल्या तीन वर्षात तालिबान्यांनी अनेक वेळा धमक्या दिल्या आणि आता तर त्यांच्या मुलीलाच ठार मारण्याचा प्रयत्न झाला. पण तरीही आपण मिंगोरा सोडून कुठेही जाणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे. मलालाच्या धाडसाबद्दल गेल्या वर्षी तिला राष्ट्रीय शांतता पुरस्कारही बहाल करण्यात आला. मलालावर हल्ला करणार्‍यांची ओळख पटल्याचं पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी सांगितलं. पण या हल्लेखोरांना शिक्षा करण्याचं धाडस सरकार दाखवेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2013 05:52 PM IST

बहादूर मलालाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

04 डिसेंबर

पाकिस्तानात तालिबान्यांविरोधात आवाज उठवणार्‍या किशोरवयीन मलाला युसूफझई हिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय. इंग्लंडमधल्या बर्मिंगहममधल्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. डिस्चार्ज मिळाला असला तरी तिच्यावर उपचार सुरूच राहणार आहेत. तिच्यावर पुन्हा रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी केली जाणार आहे. ती यापुढे इंग्लंडमध्येच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. 9 ऑक्टोबरला मलाला हिला तालिबानी बंडखोरांनी गोळी घालून मारण्याचा प्रयत्न केला. पण यात ती बचावलीय. तिच्यावर झालेल्या हल्ल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जगभरातून निषेध होतोय.

मलाला युसूफझई... तालिबान्यांचं वर्चस्व असलेल्या स्वात खोर्‍यातलं महत्त्वाचं शहर असलेल्या मिंगोराची राहणारी..सामान्य दिसणार्‍या या असामान्य मुलीनं वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी तालिबानी अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. तिनं 2009 साली तालिबान्यांच्या अत्याचाराविषयी लिहिलेली डायरी बीबीसीनं प्रसिद्ध केली आणि या चिमुकल्या रणरागिणीची ओळख जगाला झाली. त्यानंतर तिनं स्वत:चा स्वतंत्र ब्लॉग सुरू केला.

आज चौदा वर्षांची असलेल्या मलालाला तालिबानी बंडखोरांनी गोळी झाडून मारण्याचा प्रयत्न केला. ती शाळेतून परतत असताना तालिबान्यांनी तिची बस अडवली आणि तिचं नाव घेत बेछूट गोळीबार केला. गोळी मलालाच्या डोक्याला लागून तिच्या खांद्यात गेली. इतर दोन मुलीही जखमी झाल्या. तालिबान्यांनी या हल्ल्याचं समर्थन केलंय. 'मलाला आता बचावली तरी पुढे वाचणार नाही. आम्ही नक्कीच तिला ठार मारू. स्थानिक पश्तून लोकांच्या मूल्यांच्या विरुद्ध ती धर्मनिरपेक्ष आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा पुढाकार करते असा इशारा तालिबानी संघटनेनं दिलाय.

मलालाच्या वडिलांची मुलींची शाळा होती. ती आता बंद आहे. पण त्यांनी मलालाला नेहमीच पाठिंबा दिलाय. त्यांच्या कुटुंबाला गेल्या तीन वर्षात तालिबान्यांनी अनेक वेळा धमक्या दिल्या आणि आता तर त्यांच्या मुलीलाच ठार मारण्याचा प्रयत्न झाला. पण तरीही आपण मिंगोरा सोडून कुठेही जाणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे.

मलालाच्या धाडसाबद्दल गेल्या वर्षी तिला राष्ट्रीय शांतता पुरस्कारही बहाल करण्यात आला. मलालावर हल्ला करणार्‍यांची ओळख पटल्याचं पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी सांगितलं. पण या हल्लेखोरांना शिक्षा करण्याचं धाडस सरकार दाखवेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2013 05:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close