S M L

मुंबईवरील हल्ल्यात नर्सेसनी दाखवली बहादुरी

5 डिसेंबर, मुंबईउदय जाधवमुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात, सामान्य मुंबईकरांनीही आपलं जिगरबाज स्पिरीट दाखवलं. कामा हॉस्पिटलच्या नर्सनीही प्रसंगावधान दाखवून, नवजात मुलं आणि त्यांच्या आईंना दहशतवाद्यांपासून वाचवलं. कामा हॉस्पीटलमध्ये छाया लाड गेली पंधरा वर्ष नर्सचं काम करत आहेत. हॉस्पिटलमध्ये जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा त्यांनी प्रसंगावधान राखून वॉर्डमधल्या पेशंटना सुरक्षित ठिकाणी ठेवलं. "गोळीबाराचा आवाज झाला तेव्हा आम्ही पेशंट्स आणि बाळं यांना घेऊन बाथरूममध्ये लपलो. तिथे आम्ही चार तास काढले" असं त्यांनी सांगितलं.छाया लाड यांच्याबरोबर त्यावेळी शेख नजमुद्दीनही होत्या. "आम्ही सगळ्यांना सारखा धीर देत होतो. आम्ही सगळे लाईट्स बंद केले. ज्यांच्याकडे मोबाईल होते, त्यांना ते बंद करायला सांगितले. एकमेकांना धीर देत आम्ही वेळ निभावून नेली" असं त्या म्हणाल्या. नर्सेसच्या या कामगिरीचं पेशंट्सनीही कौतुक केलं.सीएसटी स्टेशन मधुन पळाल्या नंतर दहशतवाद्यांनी कामा हॉस्पीटलला पहिलं टार्गेट केलं. दहशतवादी कामा हॉस्पिटलच्या सहाव्या मजल्यावर गेले होते. तिथं त्यांनी गोळीबार तर केलाच शिवाय चार हॅन्डग्रेनेडही फोडले. त्यानंतर दहशतवाद्यांनी याच कामा हॉस्पीटलच्या सहाव्या मजल्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या कसोटीच्या प्रसंगातही कामा हॉस्पीटलच्या नर्सेसेनी आपल्या कतृत्वाचं अनोखं उदाहरण दाखवून दिलंय. मुंबईवर आजपर्यंत जेवढी संकटं आली, त्या प्रत्येक वेळी मदतीचा पहिला हात दिला, तो सामान्य मुंबईकरांनीच. यावेळीही मुंबईकर आपल्या कर्तव्याला विसरला नाही. दहशतवाद्यांनी कितीही हल्ले केले तरी ते मुंबईकरांच्या स्पिरीटशी सामना करू शकत नाही, हेट यानिमित्तानं स्पष्ट झालंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 5, 2008 07:43 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 5, 2008 07:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close