S M L

पेट्रोलच्या दरात 35 पैशांनी वाढ

16 जानेवारीमहागाईच्या खाईत होरपाळणार्‍या सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. आजपासून पेट्रोलच्या दरात लिटरमागे 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. नव वर्षात इंधन दरवाढीचं वादळ सर्वसामान्यावर घोंघावत असताना पहिली दरवाढ कोसळली आहे. चालू वर्षात डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होणार असे स्पष्ट संकेत पेट्रोलियम खात्याने दिले आहे. अनुदानित सिलिंडरची संख्या सहावरून नऊ करण्याचाही पेट्रोलियम मंत्रालयाचा विचार आहे. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर तीन ते साडेचार रुपये, तर स्वयंपाकाच्या अनुदानित सिलिंडरच्या दरात 100 रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ दोन टप्प्यात करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच एप्रिलपासून तोटा भरुन निघेपर्यंत 50 रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. डिझेलची तीन ते चार रुपये दरवाढ एकदमच करण्याचा किंवा दरमहा एक किंवा दीड रुपये वाढीचा प्रस्ताव आहे. रॉकेलच्या दरातही दरमहा 35 पैसे किंवा दर तिमाहीला एक रुपया अशी दरवाढ होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2013 12:16 PM IST

पेट्रोलच्या दरात 35 पैशांनी वाढ

16 जानेवारी

महागाईच्या खाईत होरपाळणार्‍या सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. आजपासून पेट्रोलच्या दरात लिटरमागे 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. नव वर्षात इंधन दरवाढीचं वादळ सर्वसामान्यावर घोंघावत असताना पहिली दरवाढ कोसळली आहे. चालू वर्षात डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होणार असे स्पष्ट संकेत पेट्रोलियम खात्याने दिले आहे. अनुदानित सिलिंडरची संख्या सहावरून नऊ करण्याचाही पेट्रोलियम मंत्रालयाचा विचार आहे. तर डिझेलच्या दरात प्रति लिटर तीन ते साडेचार रुपये, तर स्वयंपाकाच्या अनुदानित सिलिंडरच्या दरात 100 रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ दोन टप्प्यात करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच एप्रिलपासून तोटा भरुन निघेपर्यंत 50 रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. डिझेलची तीन ते चार रुपये दरवाढ एकदमच करण्याचा किंवा दरमहा एक किंवा दीड रुपये वाढीचा प्रस्ताव आहे. रॉकेलच्या दरातही दरमहा 35 पैसे किंवा दर तिमाहीला एक रुपया अशी दरवाढ होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2013 12:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close